आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकांना बस, कार, इत्यादी वाहनांतून प्रवास करताना उलटी होते. यास मोशन सिकनेस असे म्हणतात. मोशन सिकनेस हा आजार नसून एक स्थिती आहे. आपण प्रवास करत असताना आपले कान, डोळे आणि त्वचा मेंदुला वेगवेगळे सिग्नल पाठवतात. यामुळे नव्हर्स सिस्टीमचा गोंधळ उडाल्याने चक्कर, मळमळ, उलटी असा त्रास होतो. यावर खास घरगुती उपाय असून ते केल्यास आराम मिळू शकतो.
हे उपाय करा
१) पुदिना
पुदिना यावर रामबाण उपाय आहे. यातील मेंथॉलमुळे पोटातील मांसपेशी शांत होऊन मळमळ कमी होते. मोशन सिकनेसची समस्या दूर होते.
२) लिंबू
लिंबू किंवा लिंबाच्या रसामध्ये सायटिड्ढक अॅसिड असल्याने प्रवासादरम्यान उल्टी, मोशन सिकनेस आणि पोटासंबंधीचा त्रास कमी होतो. लिंबाचा केवळ वास घेतला तरी आराम मिळतो.
३) खारे क्रॅकर्स
हे चवदार खाद्यपदार्थ पोटातील अतिरिक्त अॅसिड शोषून घेतात. यामुळे मोशन सिकनेसपासून आराम मिळतो.
४) अद्रक
प्रवास करण्यापूर्वी एक कप अद्रकचा चहा प्या. यामुळे उल्टी होत नाही. मळमळही थांबते.
५) अॅप्पल साइडर व्हिनेगार
एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा अॅप्पल साइडर व्हिनेगार आणि एक चमचा मध मिसळून प्या.