‘ही’ माहिती असेल तर महिला बनवू शकतात ‘पौष्टिक जेवण’

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आरोग्य चांगल्या ठेवण्यासाठी आहार खूप महत्वाचा ठरतो. शिवाय, शरीराच्या गरजा माहिती असल्यास पौष्टिक आहार बनविणे सहज शक्य होते. पौष्टिक पदार्थांची एक यादीच महिलांनी तयार केली तर पौष्टिक जेवण बनविणे सापे ठरू शकते. अशा सहा पदार्थांबाबत आपण माहिती घेणार आहोत, जे घरात सहजपणे उपलब्ध असतात. या पदार्थांमध्ये पौष्टिक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
आयर्न, प्रोटीन, मेलाटॉनिन, बायोटिन, प्रोबायोटिक्स, कोएंझाइम क्यू १०, फॉलेट, ओमेगा ३ फॅटी अँसिड्स, फ्लॅक्ससिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, फायबर, मिनरल्स, व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिन, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स, काबरेहायड्रेट्स ही शरीरासाठी गरजेची १८ पौष्टिक तत्त्वे आहेत. यापैकी सहा तत्त्वे टॅब्लेट, कॅप्सूलद्वारे मिळवता येतात. उर्वरित १२ पौष्टिक तत्त्व आपण जाणून घेणार आहोत.

पनीर
यामध्ये कॅल्शियम, काबरेहायड्रेट, व्हिटॅमिन डी यासारखी तत्त्वे असतात.

संत्री
यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, तसेच बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन ए, प्रोटीन, कॅल्शियम असते.

पालेभाज्या
हिरवी पाने असणा‍ऱ्या भाज्यांमध्ये आठ ते दहा पोषक तत्त्वे असतात.

डाळी
यात प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फायबर, काबरेहायड्रेट्स, व्हिटॅमिन बी, फॉलेट, थायमिन, आयर्न, झिंक, व्हिटॅमिन ए, फॉस्फरस असते.

टोमॅटो
यामध्ये व्हिटॅमिन ए, सी, बी कॉम्प्लेक्स, प्रोटीन, आयर्न, काबरेहायड्रेट, मॅग्नेशियम असते.

सफरचंद
यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलेट, प्रोटीन, कॅल्शियम, काबरेहायड्रेट, व्हिटॅमिन ए असते.

हे पदार्थ असे खावेत

पालेभाज्या उकळून, डाळी प्रेशर कुकरमध्ये, टोमॅटो मोठे तुकडे फ्राय, अथवा डीप फ्राय करावे, सफरचंद सालीसकट खाणे, संत्र्याचा ज्यूस बनवणे, पनीर भाजीत वापरावे.