आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मायग्रेनमुळे होणाऱ्या वेदना खूप असह्य असतात. यामुळे संपूर्ण दिवस त्रासदायक जातो. मात्र, मायग्रेनचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्रास कमी होऊ शकतो. मायग्रेनमध्ये होणारी डोकेदुखी न्यूरोलॉजिकल आणि रक्ताभिसरणाशी संबंधित असते. यामुळे वेदना दूर करण्यासाठी केवळ वेदनाशामक औषधांवरच अवलंबून राहू नये. यासाठी नियमित जीवनशैली स्वीकारावी आणि सोबत दुष्परिणाम न करणारे उपाय करावेत. मायग्रेनचा त्रास दूर करणारे पाच उपाय कोणते आहेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
मान, खांदे आणि डोळ्यांच्या स्नायूंवर ताण पडल्याने देखील मायग्रेनच्या वेदना वाढू शकतात. अशा वेळी शरीरासोबतच मेंदूलादेखील रिलॅक्स ठेवणे गरजेचे आहे. दीर्घ श्वसन आणि स्ट्रेचिंग करणे सर्वात चांगला उपाय आहे. दिवसातून तीन वेळा मान आणि खांद्याची स्ट्रेचिंग करावे. तसेच १५ मिनिटे दीर्घ श्वसन करावे. तसेच चहात पुदिना आणि तुळशीच्या पानांचा वापर केल्याने तणाव कमी होतो आणि स्नायू रिलॅक्स होतात. तसेच मायग्रेनची शक्यता कमी होते. कॅफिनयुक्त पेय पदार्थांपासून दूर राहावे. अशा पदार्थांमुळे रक्तदाब वाढतो आणि मायग्रेनचा त्रास आणखी वाढतो.
हा त्रास असल्यास उपाशी राहू नका. यामुळे मायग्रेनचा त्रास आणखी वाढतो. थोड्या-थोड्या वेळाने जेवण करत राहीले पाहिजे. कारण शरीरात साखरेची पातळी अनियमित झाल्यामुळेच वेदना होतात. मायग्रेनच्या तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी थंड पाण्याची पट्टी उपयोगी आहे. यामुळे काही वेळातच आराम मिळतो. जे लोक वेदनाशामक औषधे घेण्याचे टाळतात, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. सर्दी-खोकला जास्त असल्यास हा उपाय करू नये.
गोड खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थांचे अधिक सेवन केल्याने मायग्रेनची समस्या आणखी वाढू शकते. यापासून बचाव करण्यासाठी शरीर हायड्रेट असणे गरजेचे आहे. त्यामुळे पौष्टिक आहार घ्यावा. भरपूर पाणी आणि ताज्या फळांचा रस प्यावा. जंक फूड खाण्याचे पूर्णपणे टाळावे. तसेच चहात पुदिना आणि तुळशीच्या पानांचा वापर केल्याने तणाव कमी होतो आणि स्नायू रिलॅक्स होतात. तसेच मायग्रेनची शक्यता कमी होते.