आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अयोग्य जिम ट्रेनर निवडल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. ट्रेनरने तुम्हाला क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करण्यास सांगितले तर शारीराला फायदा होण्याऐवजी नुकसान सोसावे लागेल. यासाठी योग्य ट्रेनर निवडताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे लक्षात ठेवा
१ आऊट ऑफ शेप ट्रेनर
जो ट्रेनर स्वत:च फिट नसेल, तो तुम्हाला मोटिव्हेशन देऊ शकणार नाही. यासाठी फिट असलेला ट्रेनरच निवडा.
२ पुशी ट्रेनर
क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करायला लावणारा ट्रेनर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
३ लेझी ट्रेनर
एकदा तुम्हाला मार्गदर्शन करून नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करणारा ट्रेनर घेऊ नका. त्याने सतत तुमच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तो त्याच्या कामात, मोबाइलवर, गप्पांमध्ये मग्न राहिल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
Visit : arogyanama.com