अंडरआर्म डार्कनेस दूर करण्याचे ९ घरगुती रामबाण उपाय
आरोग्यनामा ऑनलाइन टीम : कडक उन्हामुळे गोरा रंगही काळा पडतो. उन्हाळ्यात स्लीवलेस कपडे परिधान करत असल्यास तसेच कपड्यांच्या सततच्या घर्षणामुळे अंडरआर्म डार्क होतात. अंडरआर्म डार्कनेसची समस्या असल्यास काही खास घरगुती रामबाण उपाय करावेत.
हे आहेत रामबाण उपाय
१) केशराची पाने दुधात बारीक करून घ्यावीत. ही पेस्ट रात्री लावल्यास लवकर लाभ होतो.
२) कच्चे लिंबू कापून त्यामधील रस काढून घ्यावा. त्यानंतर लिंबाच्या सालीमध्ये मधाचे काही थेंब टाका. या लिंबाने अंडरआर्म स्किनवर हलक्या हाताने मालिश करावी. महिनाभर हा प्रयोग केल्यास येथील त्वचा उजळते.
३) कच्च्या दुधामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळावा. या मिश्रणाने अंडरआर्मच्या डार्क स्किनवर मालिश केल्यास डार्कनेस दूर होतो.
४) थोडा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये पाणी टाकून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट अंडरआर्मवर लावा. वाळल्यानंतर पेस्ट धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास अंडरआर्म डार्कनेस नष्ट होईल.
५) बटाट्याची एक स्लाईस अंडरआर्म स्किनवर नियमितपणे रगडल्यास अंडरआर्मचा काळपटपणा दूर होतो.
६) काकडीच्या रसामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मीठ मिसळून हलक्या हाताने अंडरआर्मवर मालिश करावी.
७) थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये दुध मिसळून पेस्ट तयार करा. अंडरआर्मवर ही पेस्ट लावा आणि वाळल्यानंतर धुवून घ्या. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास चांगला फरक पडतो.
८) ताज्या कोरफडीचा एक तुकडा कापून जेल काढून अंडर आर्मवर दररोज लावा. यामुळे अंडरआर्मचा डार्कनेस दूर होतो.
९) संत्र्याची साल सावलीत वाळवून पावडर तयार करावी. या पावडरमध्ये थोडे दुध आणि गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट अंडरआर्म डार्कनेसवर थोडावेळ लावून ठेवा आणि वाळल्यानंतर धुवून घ्या. नियमितपणे हा उपाय केल्यास अंडरआर्मचा डार्कनेस दूर होतो.