आरोग्यानामा ऑनलाइन टीम – शरीर निरोगी राहण्यासाठी योग्य आहार आणि थोडा व्यायाम आवश्यक असतो. यासाठी खुप घाम गाळण्याची गरज नसते. ज्यांना अतिशय पिळदार शरीर हवे असते, तेच जीममध्ये मोठ्याप्रमाणात व्यायाम करतात. सदैव निरोगी राहण्यासाठी थोडा व्यायाम आणि काही काळजी घेतली तर तेवढे पुरेसे असते. यासाठी आहाराबाबत कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण माहिती घेणार केला तरी पुरेसे ठरते.
नियमित आहारनियमनासह व्यायाम करणे यासाठी अत्यावश्यक आहे. दिवसातून २०-२५ मिनिटे सोपा व्यायाम केल्यास फायदेशीर ठरते. आहारनियमनाबरोबरच व्यायाम केल्यास वजन घटवणे सोपे जाते. व्यायामाचे वेळापत्रक जोडीदारासह पाळायला हवे. त्यामुळे तुमचा व्यायाम मजेदार होईल तसेच दोघांना सोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यायामात वेट ट्रोनिंगसोबतच कार्डियोव्हॅस्क्युलर व्यायामाचाही समावेश करावा. त्यामुळे मेद घटवता येईल. दररोज व्यायाम करण्यास वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून कमीत कमी चार-पाच वेळा नक्की व्यायाम करायला हवा.
आहारात कमी उष्मांकाच्या मसाल्यांचा वापर करावा. मेयोनीजऐवजी मोहरीचा वापर केला जाऊ शकतो. खाण्याचे वहीखाते मेंटेन करावे. दिवसभर जे खाल, त्याची नोंद करावी. त्यावरून तुम्ही किती अतिरिक्त उष्मांक ग्रहण केलेत ते समजते. बाहेर जेवण केल्यास फास्ट कोर्स मीलमध्ये सॅलड व सूप जरूर घ्यावे. त्यामुळे पोट भरेल आणि जास्त उष्मांकाचा आहार घेणार नाहीत. बाहेर जेवण केल्यानंतर जर तुम्हाला गोड खाण्याचा मोह आवरत नसेल तर कुणाला तरी सोबतीला घ्या. आहारनियमन करताना आठवड्यात एखाद्यावेळी स्वत:ला मेजवानी देता येईल. अधूनमधून ब्रेक घेतल्यास आहारनियमन योग्य पद्धतीने करता येते.