अकाली वृद्धत्व टाळायचेय ? मग ‘हे’ उपाय आवश्य करा
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहानपण, तारुण्य, आणि म्हातारपण हे मानवी जीवनाचे तीन भाग आहेत. यात तारुण्य अधिक महत्वाचे मानले जाते. हे तारूण्य काय टिकावे असे प्रत्येकाला वाटत असते. काहीजण तारूण्य टिकवण्यासाठी विविध प्रकारचे उपचार करत असतात. यासाठी ऑपरेशन, औषधे यांचा वापर केला जातो. असे हे तारूण्य सर्वांसाठी हवेहवेसे असते.
मात्र, अनेकदा अकाली वृध्द्त्वाला सामोरे जावे लागते. बदलेली जीवनशैली, असंतुलीत आहार यामुळे हे अकाला वृद्धत्व येत असते. यावर उपाय करता येणे शक्य आहे. याच उपायांची माहिती आपण घेणार आहोत.तारुण्य जपण्यासाठी सतत श्रम करत रहावे. यामुळे शरीरात तेज निर्माण होते.
तारूण्य जपण्यासाठी योगा हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. शिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होऊ शकतात. आपल्या दिनक्रमात सुधारणा करुन शरीराला आराम मिळेल याची काळजी अशा व्यक्तींनी घेतली पाहिजे. माणसाला सहा तासांची झोप अतिआवश्यक आहे. पूर्ण झोप, सात्विक आहार आणि यासह योगासने केल्यास तारुण्य जास्ती काळ टिकवता येऊ शकते.