आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिला आणि पुरूषांमध्ये पोषकतत्वांच्या गरजेचे प्रमाण वेगवेगळे आहे. यामागे हार्मोन्ससह विविध कारणे आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये लाल रक्तपेशी अधिक असतात, हे सुद्धा यापैकी एक कारण आहे. पुरुषांचे शरीर महिलांच्या तुलनेत प्लाज्मा ग्लूकोजच्या कमतरतेचा सामना करु शकत नाही. यामुळे दोघांच्याही पोषकतत्वांची गरज वेगळी असते. महिला, पुरूषांनुसार पोषकतत्व गरज यांची माहिती आपण घेणार आहोत.
पोषकतत्व आणि गरज
1 प्रोटीन
प्रोटीन मांस-मच्छीतून भरपूर मिळू शकते. शाकाहारी लोकांना चणे, मटार, मूग, मसूर, उडीद, राजमा, गहू, मका यातून मिळते. पुरुषांनी नियमीत 56 ग्रॅम प्रोटीन घ्यायला हवे.
2 व्हिटॅमिन
लाल मिरची, ब्रोकोली, पालक, ब्रसल्स, स्प्राउट्स, जांभुळ, टोमॅटो, बटाटे आणि फ्लॉवर यात व्हिटॅमिन अधिक असतात. फॅट सॉल्यूबल आणि वॉटर सॉल्यूबल असे व्हिटॅमिन्सचे दोन प्रकार असतात. व्हिटॅमिन इम्यून सिस्टीमसह पेशी, हाडे, दातांना मजबूत करतात. पुरुषांच्या लैंगिक आरोग्यासाठीही व्हिटॅमिन्स आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे अनीमिया, कमजोर दात, सांधेदुखी आणि केसगळती आदी समस्या होतात.
3 कॅल्शिअम
कॅल्शिअम पुरुषांसाठी खुप आवश्यक असते. याच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात. कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी पालेभाज्या, फळांचे सेवन करावे. दुधातही अधिक प्रमाणात कॅल्शिअम असतात.
4 कॅलरी
महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या निरोगी आणि फिट राहण्यासाठी अधिक कॅलरीजची गरज असते. जर एखाद्या व्यक्तीचं वजन 180 पाऊंड असेल तर त्या पुरुषाला रोज साधारण 2000 ते 3000 कॅलरीजची गरज असते. तर 130 पाऊंडच्या एका महिलेला रोज साधारण 1400 कॅलरीजची गरज असते.