आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही लोक कामाच्या ठिकाणी आठ-आठ तास बसून काम करतात. कामावरून घरी आल्यानंतरही एकाच ठिकाणी बसून टिव्ही पाहतात, जेवण करतात आणि रात्री झोपी जातात. शिवाय, कामाच्या ठिकाणी व अन्य कुठेही जाण्यासाठी गाडीचा वापर करतात. यामुळे शरीराची योग्य ती हालचाल होतच नाही. आठवडा, महिना उलटला तरी अनेकांचे पायी चालणे होतच नाही. मात्र, हे आरोग्याच्या दृष्टीने खुपच धोकादायक ठरू शकते.
चालण्याचे हे आहेत फायदे
१. रोज किमान काही वेळ तरी पायी चाला.
२. आरोग्यासाठी चालणे अत्यंत उपयोगी आहे.
३. व्यायाम म्हणून चालण्यापेक्षा रोजच्या साध्या साध्या गोष्टी पायी जाऊनच करा.
४. पायी चालल्याने ताणतणाव किमान निम्म्याने कमी होईल.
५. पायी चालल्याने संवाद वाढतो. हृदयाची शक्ती वाढते. उत्साह वाढतो.
६. नवी आव्हाने घेण्यासाठी तुम्ही सज्ज होता.
हे लक्षात ठेवा
* व्यायाम म्हणून चाला.
* जवळपासची छोटीमोठी कामे पायी फिरुनच करा.
* पायी चालल्याने फ्रेश झाल्यासारखे वाटेल.