आरोग्यनामा टीम- पिंपल्स, डाग, सुरकुत्या अशा त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्रीम आणि लोशनचा वापर करतात. पण प्रत्येकवेळी याचा फायदा होईलच असे नसते. मात्र तुम्ही जर नैसर्गिक पद्धतीचा वापर करून घरगुती उपाय केले तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. लवकरच तुमच्या चेहरवर झालेला परिणाम तुम्हाला पहायला मिळेल.
कडूलिंब आणि मधाच्या फेसपॅकने तुम्ही तुमच्या त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करू शकता. त्वचेसंबंधीची समस्या असेल तर हा घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. त्वचेसंबंधी काही समस्या असतील तर कडूलिंबाचा वापर करणे सर्वात चांगला उपाय मानला जातो. जर तुम्ही कडूलिंबासोबत मधाचा वापर करत असाल तर त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या दूर होतील. हे फेसपॅक तयार करण्यासाठी 3 ते 4 कडूलिंबाची पाने आणि 1 चमचा मध घ्या.
सर्वातआधी कडूलिंबाची पाने 20 मिनिटे पाण्यात बुडवून ठेवा. यानंतर त्याची बारीक पेस्ट तयार करा. त्यामध्ये मध मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून 15 मिनिटांसाठी तशीच ठेवा. थोड्यावेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला जर पिंपल्सची समस्या असेल तर बाहेरील औषधांवर भरमसाठ पैसे करण्यापेशा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमचे पैसे देखील वाचतील. या फेसपॅकमुळे तुमची पिंपल्सची समस्या काही दिवसांत दूर होईल.
या उपायाने तुमची पिंपल्सची समस्या दूर तर होतेच शिवाय या फेसपॅकमुळे तुमची त्वचा मुलायम होते. शुष्क त्वचेसाठी हा फेसपॅक फार फायदेशीर ठरतो. तसेच शरीरावर कोणत्याही प्रकारचे घाव किंवा जळाल्याचे डाग असतील तर यामुळे ते दूर करता येऊ शकतात. मधात अनेक नैसर्गिक औषधी गुण आहेत. त्यामुळे याचा वापर वेगवेगळ्या समस्यांसाठी केला जातो. पिंपल्स किंवा डागांसोबतच तुम्ही या फेसपॅकने ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेडपासूनही सुटका मिळवू शकता. या फेसपॅकच्या मदतीने तेलकट त्वचेची समस्याही दूर केली जाऊ शकते.