हाय हिल्स वापरताना घ्या काळजी !
आरोग्यनाम ऑनलाईन- फॅशन च्या युगात कपड्यावर जितके लक्ष दिले जाते, तितकेच लक्ष पायातील हाय हिल्स वर दिले जाते. कपड्यांच्या ट्रेंड सोबत हिल्स चा हि ट्रेंड काळजीपूर्वक पहिला जातो. क कोणत्या कपड्यावर कोणत्या हिल्स जास्त सूटहोतील यासाठी तासनतास आरश्य समोर उभे राहून परीक्षण केले जाते. जर इतक्या महत्वाच्या या हिल्स असतील तर त्या वापराव्या कश्या आणि आपल्या उंचीच्या मानाने जास्त हिल्स वाप्र्यातर त्याचा परिणाम आपल्याला विविध समस्या निर्माण करू शकतात. उंची कमी असल्यास किंवा फॅशन म्हणून उंच टाचांच्या चपला वापरल्या जातात. मात्र यामुळे पायांच्या समस्या निर्माण होतात. पायांना सूज येते, पायांमध्ये वेदना निर्माण होतात. त्यामुळे या समस्या दूर करायच्या कशा असा प्रश्न अनेकांना पडतो. या समस्या दूर करण्यासाठी काही टीप्स
कोमट पाणी
तुमच्या त्वचेला सोसेल इतकं गरम पाणीम करा. पाय बुडतील इतकं पाणी एका भांड्यात घ्या. किमान 20 मिनिटं किंवा पाणी थंड होईपर्यंत या कोमट पाण्यात पाय ठेवा. या पाण्यात तुम्ही वेदना दूर करणारं एखादं तेलही किंवा बेकिंग सोडाही टाकू शकता.
थंड पाणी
जर तुमचे पाय सूजलेले वाटत असतील तर तर गरम पाण्यामुळे रक्तवाहिन्या अधिक प्रसरण होऊन ते अधिकच सूजल्यासारखे दिसतील. त्यामुळे थंड पाण्यात पाय बुडवू शकता. यामुळे तुमच्या पायांची फक्त सूज नव्हे, तर वेदनाही तात्काळ दूर होतील.
आईस पॅक
तुम्हाला पाण्यात पाय बुडवायचे नसतील तर तुम्ही आईस पॅक किंवा एखाद्या कापडात बर्फ गुंडाळून त्यानं सूजलेल्या भागावर शेक द्यावा. काही मिनिटांनंतर तुम्हाला आराम मिळेल.
उंचावर पाय ठेवणे
काही उशा घेऊन त्यावर पाय ठेवल्यानंही वेदना आणि सूज दूर होते. ज्यावेळी तुम्ही झोपता किंवा पुस्तक वाचताना, गाणी ऐकताना तुम्ही असं करू शकता.
खोबरे तेल
पायांच्या वेदना दूर करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खोबरे तेल. पायांवर खोबरे तेलानं काही मिनिटं मसाज करा आणि त्यावर सॉक्स घाला. यामुळे तुम्हाला आराम मिळेल. यासोबतच तळपायांना भेगा असल्यासही कमी होतील.