आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बहुतांश लोक दिवसातील सर्वाधिक वेळ हा कामाच्या ठिकाणी घालवत असतात. जर ही जागा उत्साहवर्धक, प्रोत्साहन देणारी असेल तर तिथे जाणे आणि काम करणे आनंददायी असू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तरच काम करण्याची क्षमता आणि उत्पादन क्षमता वाढू शकते. याउलट कामाच्या ठिकाणचे वातावरण रटाळ असेल तर कामावर केवळ नाइलाज म्हणून जावे लागेल. याचा तुमच्या क्षमतेवर आणि उत्पादन क्षमतेवरही वाईट परिणाम होऊ शकतो.
हे लक्षात ठेवा
१. सहकाऱ्यांना महत्व द्या. स्वतासह सहकाऱ्यांची, वरिष्ठांची, हाताखाली काम करणाऱ्यांची काळजी घ्या.
२. पूर्वग्रह, गैरसमज आणि गृहीतके सोडून द्या.
३. कामाते वेळेला महत्त्व द्या. मनाशी विश्वास बाळगा.
४. काम हा आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घ्या.
५. इतरांनी कसे वागावे असे तुम्हाला वाटते, तसेच तुम्ही वागा.
६. कामातून ब्रेक घ्या, स्वतावर, आयुष्यावर प्रेम करा.
७. कुणाबद्दलही सतत मनात काही ठेवू नका. कुणालाही गृहित धरू नका.
८. काही गृहीतके मनाशी बाळगून ठेवण्यापेक्षा मोकळा संवाद साधा.
९. भावना दडपणे, नाकारणे, अयोग्य पद्धतीने मांडण्याऐवजी सक्षमपणे व्यक्त करा.