‘या’ पद्धतीने लावा केसांना ‘कंडिशनर’ अन्यथा …
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – केसांचा रुक्षपणा जाणून केस मऊ होण्यासाठी कंडिशनरचा वापर केला जातो. मात्र कधीकधी कंडिशनर लावूनही केस आणखीच रुक्ष बनतात. याचे कारण म्हणजे केसांना चुकीच्या पद्धतीने कंडिशनर लावणे. कंडिशनर लावल्याने लगेच केस मऊ , चमकदार होतील असा अनेकांचा समज असतो. पण कंडिशनर लावण्याची योग्य पद्धत न वापरल्याने केसांचे आणखीन नुकसानचं होते. जाणून घ्या केसांना कंडिशनर लावण्याची योग्य पद्धती –
कंडिशनर लावताना खालील टिप्स फॉलो करा –
कंडिशनर कधीही घाईघाईत लावू नये.
शॅम्पूने केस स्वच्छ धुतल्यानंतरच कंडिशनर लावा. केस न धुता, ओले करुन कंडिशनर अनेकजण लावतात. मात्र त्याने काही फायदा होत नाही.
कंडिशनर कधीही डायरेक्ट केसांना लावू नका. हातावर थोडंसं कंडिशनर घेवून दोन्ही हात एकमेकांवर चोळावेत आणि त्यानंतरच ते केसांना लावावे.
कंडिशनर लावताना केसांना वरपासून खालपर्यंत हळूहळू मसाज करा.
केसांना कमीत कमी पाच मिनिटं कंडिशनर राहू द्या. त्यानंतरच थंड पाण्याने केस स्वच्छ धुवावेत.
Comments are closed.