आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मिठाचा वापर अन्नपदार्थांची चव वाढविण्यासाठी केला जातो. तसेच त्याचा वापर साफसफाईसाठी सुद्धा करता येतो. मिठाने कपडे, भांडी सर्वकाही स्वच्छ करता येते. अशाच काही खास टिप्स आपण जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला साफसफाई करणे सोपे जाईल.
असा करा वापर
१) किचन चमकवण्यासाठी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून पुसून घ्यावे.
२) कांदा आणि लसणाचा वास घालवण्यासाठी व्हिनेगर आणि मीठ हातावर चोळावे.
३) मिठाच्या पाण्यामध्ये चांदीचे भांडे आणि दागिने काहीकाळ भिजवून ठेवा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. चांदीच्या वस्तू नव्या दिसू लागतील.
४) ओव्हन जास्त ऑयली झाल्यास मिठाच्या पाण्याने पुसून घ्या. मिठाचे पाणी टाकून कपड्याने पुसून घ्यावे.
५) काचेचे ग्लास स्वच्छ करण्यासाठी मिठाच्या पाण्यात १० मिनिट ग्लास बुडवून ठेवा. त्यानंतर लिंबू आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ग्लास चमकू लागतील.
६) जीन्स धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये डिटर्जंटसह एक कप मीठ टाका. दहा मिनिट जीन्स धुवून घ्या. जीन्स पुन्हा नव्यासारखी दिसेल.
७) प्रेस करण्याच्या आयर्नला गंज लागला असल्यास मिठाने स्वच्छ करून घ्या. गंज निघून जाईल.