आरोग्यनामा ऑनलाईन- तणाव, निद्रानाश, फास्ट फुडचा जास्त वापर केल्यामुळं हार्मोनचे असंतुलन(Hormonal Imbalance) वेगाने वाढत आहे. या असंतुलनामुळे अनेक प्रकारचे गंभीर आजार निर्माण होतात. हार्मोन्सच्या कमी(Hormonal Imbalance) किंवा अधिक बदलामुळे शरीरात बरेच बदल देखील दिसतात.
ही लक्षणे आहेत
१) अचानक वजन कमी होणे किंवा वजन वाढणे.
२)अनियमित मासिक पाळी येणे
३)ताणतणावामुळे चिंताग्रस्त होणे, भूक न लागणे, त्वरीत थकवा येणे आणि पचनक्रिया अनियत्रित असल्यामुळे सतत सूज येणे ही मुख्य लक्षणे आहेत.
हार्मोन म्हणजे काय ?
हार्मोन शरीराला संतुलित करणारा घटक आहे. जो दोन प्रकारांचा असतो एंडोक्राइन आणि एक्सोक्राइन.
एंडोक्राइन शरीरातील रक्तात मिसळला जातो. आणि वैयक्तिक पेशी पर्यंत पोहचून त्यांना जिवंत ठेवते. एक्सोक्राइन पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि शरीरावर काही लागले की मेंदूला संकेत देते.
कुशिंग सिंड्रोम म्हणजे काय
अनियमित हार्मोन्समुळे कुशिंग सिंड्रोम उद्भवते. ज्यामुळे व्यक्ती लठ्ठ होऊ शकते. मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. रुग्णाचा चेहरा सर्वकाळ लाल राहू शकतो.अगदी छोटी दुखापत झाल्यावरही हाड फ्रॅक्चर होऊ शकते.ऑस्टियोपोरोसिसचे प्रमुख कारण हार्मोन असंतुलन आहे. यामुळे शरीराच्या कोणत्याही भागात गाठ, ट्यूमर देखील होऊ शकतो. पुरुषांपेक्षा महिलांना जास्त त्रास होतो. त्यामागील मुख्य कारण म्हणजे घरातील जबाबदाऱ्या मुळे सर्वकाळ तणावग्रस्त राहतात. तणावमुळे कॉटिसोल हॉर्मोन वाढते आणि हार्मोन असंतुलित करते.
हे करणे टाळा
१)मासिक पाळीच्या पहिल्या तीन दिवस केस न धुणे.
२)मासिक पाळीच्या वेळी मीठ खाणे कमी करा.
३)थकवा आल्यास जड काम करू नका.
४) नाभीमध्ये एरंडेल तेल ठेवले तर हार्मोन अनियमततेचा त्रास होणार नाही. जर हार्मोनल असंतुलन असेल तर नियमित योग करा त्याचा फायदा होईल.
५)जेवणानंतर ब्रजआसनात बसलात तर फायदा होईल.
६)भुजंग आसन आणि सूर्यनमस्कार नियमितपणाने केल्याने आराम मिळतो.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.