आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात काय सुरू आहे याचे संकत आपल्या चेहऱ्यावरील बदलांमुळे मिळू शकतात. शरीराच्या वर होणारे आजार दिसतात, पण त्या आजारांचे मूळ हे शरीराच्या आत असते. चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, चट्टे, ब्लॅकहेड्स हे शरीरात हार्मोनल इम्बँलेस असल्याचे संकेत आहेत. शरीरातील प्रत्येक भाग एकमेकांशी जोडलेला असल्याने अॅक्युप्रेशर थेरपीमुळे मोठमोठे आजार दूर केले जातात.
पिंपल्स, डाग, काळेपणा, बारीक दाणे, तेलकट त्वचा, सुरकुत्या आणि इतर अॅलर्जीं म्हणजे आजारांचे संकेत आहे. किडनी, फुप्फुसे, शरीरातील टॉक्सिक, मेंदूचे विकार, आतड्याचे विकार, शरीरातील साखरेचे प्रमाण, कोलेस्टेरॉल, युरिक अॅसिड इत्यादी समस्यांची माहिती मिळते आणि त्यांच्यावर उपाय करता येतो. कपाळाच्या वरील भागावर पिंपल्स येणे हे किडनीमध्ये समस्या असल्याचे लक्षण आहे. कपाळ लाल होणे हे जास्ती दारू, चहा, कॉफी, पिल्याचे लक्षण आहे. कपाळावर पांढरे डाग येणे हे दूध किंवा डेअरी प्रॉडक्टचा जास्त वापर केल्यामुळे होते.
कपाळाच्या मधला भाग लाल होणे हे जास्त गोड खाल्ल्यामुळे किंवा टेन्शन घेतल्यामुळे होते. कपाळाच्या खालच्या भागावर पिंपल्स येणे हे जास्त ताण, कमी रक्ताभिसरण आणि अपुऱ्या झोपेचे लक्षण आहे. त्यासोबतच केसांमध्ये जास्त केमिकल्स किंवा तेलाचा जास्त वापर केल्यास कपाळावर पोमेड अॅक्ने तयार होतात. भुवयांच्या मधला भाग हा लिव्हर आणि पित्ताशयाशी जोडलेला असतो. भुवयांच्या मध्ये दोन उभ्या रेषा येत असतील तर ते लिव्हरमध्ये फॅट आणि कफाचे प्रमाण वाढल्याचे लक्षण आहे.
नाक शरीरातील नाडी, रक्त धमन्या आणि हृदयाशी जोडलेले असते. नाकावर मोठ्या आकाराचे पिंपल्स येणे हे हृदयात आणि रक्तामध्ये अशुद्धता असल्याचे लक्षण आहे. त्यासोबतच जास्त चहा, कॉफी, दारू गुटखा यांच्या सेवनाने नाकावर पिंपल्स येतात. नाक लाल होणे आणि सूज येणे हे कफाचे प्रमाण वाढल्याचे व लिव्हरमध्ये समस्या असल्याचे लक्षण आहे. डोळ्याखाली काळे डाग येणे किंवा डोळे लाल होणे किंवा डोळ्यावर सूज येणे हे लिव्हरमध्ये समस्या असल्याचे लक्षण आहे. असंतुलित आहारामुळे डोळ्यावरील त्वचेवर सूज येते. ओठ लाल किंवा गुलाबी असल्यास किडनी चांगल्या प्रकारे काम करत आहे हे समजावे. जर किडनीत काही समस्या असेल तर ओठ काळे पडणे ते कोरडे पडणे किंवा त्यांच्यात भेगा पडणे ही लक्षणे दिसून येतात.
गालावर पिंपल्स येणे हे फुप्फुसातील संभाव्य त्रास, रक्ताभिसरणात समस्या आणि पचनात अडथळा याचे लक्षण आहे. गाल बारीक होणे हे शरीरात प्रोटिनची कमतरता असल्याचे लक्षण आहे. महिलांमध्ये गालावर बारीक केस येतात, ते रिप्रोडक्टिव्ह सिस्टिममध्ये गडबड असल्याचे लक्षण आहे. किडनीमध्ये समस्या असल्यास कानावर मोठे पिंपल्स येतात त्यासोबतच कान लाल होतात.