आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कडधान्य ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्यामुळे डॉक्टर आपल्याला कडधान्य खायला सांगतात. कडधान्यात मोडणारे चणे (हरभरे) हे विविध आपल्या आरोग्यासाठी तर उपयुक्त आहेच. पण चणे खाल्याने आपले अनेक आजार नियंत्रणात येऊ शकतात. जाणून घेऊ चणे खाण्याचे फायदे.
चणे खाल्याने होतात हे फायदे
१) २५ ग्रॅम काळे चणे भिजत घालून सकाळी रिकाम्या पोटी खा यामुळे तुमची मधुमेहाची समस्या दूर होते.
२) चणे गरम करून रुमालात घेऊन त्याचा वास घेतल्याने सर्दी कमी होण्यास मदत होते.
३) सकाळच्या नाष्ट्यामध्ये चणे खाल्ले तर वजन कमी होण्यास मदत होते.
४) उकडलेले चणे ३ वर्ष सलग खाल्याने कुष्ट रोगामध्ये फायदा होतो.
५) जर गर्भवती महिलेस उलट्या होत असतील तर भाजलेल्या चण्याचे पेय बनवून पिले तर उलट्या कमी होतील.
६) चणे पचनशक्ती वाढवते. आणि मेंदूची शक्ती वाढवते. चणे रक्त शुद्धीकरण करण्यास मदत करते ज्याने त्वचा उजळते.
७) डायबिटीज रुग्णांना चणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
८) अशक्तपणा आलेल्या रुग्णांना चणे अतिशय फायदेशीर आहेत.
९) चणे भिजविलेल्या पाण्याने चेहरा धुतला तर चेहऱ्यावर चांगली चमक येते.