होमिओपॅथी औषधं घेताना ‘ही’ काळजी आवश्य घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – होमिओपॅथीची औषधं घेतांना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. होमिओपॅथीचे उपचार घेताना ही पथ्य पाळली तर योग्य उपचार होवू शकतात, पथ्यामुळे औषधांचा प्रभाव चांगला टिकून राहतो. परंतु, ही औषध घेताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. त्यामुळे जाणून घ्या होमिओपॅथी औषध घेताना घ्यावायची  काळजी.

होमिओपॅथी औषध घेताना घ्यायची काळजी पुढीलप्रमाणे :

१) होमिओपॅथीची औषधं घेतल्यानंतर ती उघडी ठेऊ नका.

२) औषध नेहमी कोरड्या आणि थंड जागेतच ठेवा. औषध टोपणाने घ्या. औषधांना स्पर्श करु नका.

३) द्रव स्वरुपातलं औषध असल्यास ड्रॉपरचा वापर करा.  कुठलीही औषधं घेण्याआधी किंवा सोडण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. होमिओपॅथी औषधं घेत असताना आयुर्वेदीक उपचार पद्धतींचा वापर टाळा.

४) होमिओपॅथी उपचार घेताना आहारात तिव्र गंध असलेले पदार्थ टाळणं चांगलं. लसुण, आलं, कच्चे कांदे, कॉफी  यांसारख्या पदार्थांना तीव्र गंध असतो.
तीव्र गंधामुळे होमिओपॅथी औषधांचा परिणाम कमी होतो.

५) होमिओपॅथी औषधं घेण्याच्या अर्धा तास आधी आणि अर्धा तास नंतर काहीही खाणं किंवा पिणं टाळा.
साध्या पाण्याशिवाय कुठल्याही पदार्थाचं सेवन करता कामा नये.

६) या औषधांच्या प्रभावी परिणामांसाठी धुम्रपान, दारु, तंबाखूचं व्यसन करू नका. काही नवीन संशोधनानुसार अर्ध्या तासाचा नियम पाळल्यास या पदार्थांचा दुष्परिणाम होणार नाही.