आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आयुर्वेदाची आपली परंपरा खूप प्राचीन आहे. अनेक आजारांवर पूर्वी आयुर्वेदिक उपायच केले जात असत. आजही अनेक घरातील सदस्य छोट्या छोट्या आजारांसाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. घरच्याघरी उपचार करून अशा आजारांवर उपचार केले जातात. परंतु, याबाबत सर्वांनाच माहिती नसल्याने अशा आजारांवर मेडिकलमधून गोळ्या आणून घेतल्या जातात. याचे दुष्परिणामही होऊ शकतात. म्हणून घरच्या घरी उपाय करणे कधीही योग्य ठरते.
हे उपाय करा
* बदाम तब्येतीसाठी उपायकारक आहेत. रात्रभर बदाम भिजवून ठेवावे आणि सकाळी वरची साल काढून खावे, तर हिवाळ्यात विना साल काढताच खावे. यामुळे डोळ्याची नजर वाढते, तसेच स्मरणशक्ती आणि शरीरात गरमीसुध्दा वाढते.
* मोहरीचे तेल गुणकारी आहे. हे थोडे गरम करून सांध्यांवर लावले तर खुप आराम मिळते. सर्दीपासूनही आराम मिळतो. शरीरावरील कोरडेपणा मिटतो.
* दूध आणि दही भारतीय स्वयंपाकघरात वापरले जाते. मात्र केसांमध्ये कोंडा असेल, तर केसावर हलक्या हाताने दही लावल्यास एका मिनिटात कोंडा गायब होतो. आणि केसांमध्ये एक वेगळी चमक येते.
* उचकी लागल्यास एक चमचा साखर तोंडात टाकून हळू हळू चावल्याने उचकी कमी होते.
* वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मध हा एक चांगला उपाय आहे. वजन कमी करण्यासाठी एक ग्लास गरम पाणी घ्या, आणि त्यात एका लिंबूचा रस आणि दोन चमचे मध टाकून घ्या, लवकरच जाडी कमी होईल.
* सौंदर्यापासून ते त्वचा, पोट आणि सर्दी इत्यादी आजारांवर हळद उत्तम उपाय आहे. दुखापत, कापणे अथवा सर्दी-खोकला यावर गरम दूधात दोन-तीन चिमूट हळद टाकून पिल्याने लगेच आराम मिळतो.
* जुलाब लागल्यावर केवळ एक केळी खाल्यानेही आराम पडतो. कॉन्स्टिपेशनमध्ये २-३ केळी खाल्याने लगेच फरक जाणवतो. पिकलेली केळी पोटात जळजळत असताना खाल्याने आराम पडतो. सौंदर्यप्रसाधनांमध्येही केळीचा फेसपॅक म्हणून वापर करता येतो.
* पोट खराब होणे, अॅसिडिटी यावर अर्धा चमचा ओवा आणि एक चिमूट मिठ घेतल्याने अॅसिडीटी लगेच कमी होते.
* १०-१५ तुळशीची पाने आणि ८-१० काळ्या मिरीचे दाणे एकत्रकरून त्याची चहा बनवून प्या, खोकला, सर्दी आणि तापापासून आराम मिळतो.
* सर्दी आणि खोकल्यालाही आद्रक पळवून लावते. अदरकची चहा मायग्रेनसाठीही उपयुक्त आहे.