आरोग्यनामा ऑनलाईन टीम – ब्लॅकहेड्स चेहऱ्याच्या सौंदर्यात बाधा आणतात. चेहऱ्याच्या त्वचेवर पोर्समध्ये ऑइल आणि डेड स्किन सेल्स जमा झाल्याने ब्लॅकहेड्स तयार होतात. विशेषतः नाकावर व नाकाच्या आजूबाजूला ते जास्त प्रमाणात येतात. ब्लॅकहेड्सपासून सुटका करून घेण्यासाठी अनेक उपाय करतात. पार्लरमध्ये ब्लॅकहेड्स पोर्सवर दाब देऊन काढण्यात येतात. पण असं केल्याने चेहऱ्याला वेदना तर होतातच शिवाय हाताच्या नखांचे डाग पडतात. ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. त्यासाठी स्क्रबिंग करणे ,फेसमास्क लावणे यांसारखे उपाय करता येतील.
ब्लॅकहेड्सवर घरगुती उपाय
१) स्क्रबिंग
साखर –
एक चमचा साखरेत एक चमचा मीठ मिसळा. हे मिश्रण घेऊन हलक्या हाताने नाकावर मसाज केला. १५ मिनिटानंतर हे सुकल्यानंतर पुसून टाका.
बेकिंग सोडा
२ चमचे बेकिंग सोडा, १/२ चमचा मीठ आणि १ चमचा पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. या स्क्रबने चेहऱ्यावर मसाज करा आणि त्यानंतर हलक्या गरम पाण्याने चेहरा धुवून टाका.
जास्त वेळा स्क्रब केलं तर स्किन जास्त ड्राय होऊ शकते. त्यामुळे आठवड्यातून दोनदाच हाताने स्क्रब करावं. स्क्रबचा वापर केल्यानंतर साबणाने चेहरा स्वच्छ करा. यामुळे डेड स्किन सेल्स कमी होतात आणि स्किनवरील ऑइलही निघून जातं.
२) फेस मास्क-
गुलाबजल –
एका छोटा चमचा मीठ आणि एक चमचा गुलाबजल एकत्र मिसळा. हे मिश्रण ब्लॅकहेड्सवर लावा.
अंड्याचा फेस मास्क
अंड्याचा सफेद बलकमध्ये मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्रशच्या सहाय्याने चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर मास्क काढून टाका. फेस मास्क काढल्यावर चेहरा पाण्याने धुवा.
बेसन –
एक चमचा बेसनमध्ये २ चमचे दूध आणि चिमूटभर मीठ मिसळा. ही पेस्ट ब्लॅकहेडवर लावा. १५ मिनिटे लावून ठेवा त्यानंतर चेहरा धुवा.