आरोग्यनामा ऑनलाइन टीम – धावपळीमुळे त्वचेकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. यामुळे त्वचा सुकल्यासारखी दिसते. अनेकदा काळी दिसू लागते. त्वचेचे आरोग्य बिघडते. बाजारातील उत्पादनांचा यावर विशेष परिणाम होत नाही. काही वेळा तर दुष्परिणामही दिसून येतो. यासाठी नैसर्गिक उपाय करावेत. काही निवडक आयुर्वेदिक उपचारांनी चेहरा तजेलदार आणि उजळ होऊ शकतो. यासाठी काही घरघुती फेसपॅक कसे तयार करावेत याची माहिती घेवूयात.
* हा फेसपॅक तयार करण्यासाठी मध आणि हळदीमध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळा. त्यानंतर ही पेस्ट चेहर्यावर लावून, नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने सुरकुत्या नष्ट होतील.
* दोन गाजर बारीक करून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये अर्धा चमचा मध टाका. त्यानंतर हे मिश्रण १५ मिनिट लावून ठेवल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. या उपायाने त्वचा कोमल आणि चमकदार होईल.
* चेहरा आणि ओठांवर साजूक तूप किंवा लोणी लावल्यास चमक येईल. किमान तासभर हा लेप लावून ठेवावा. यामुळे चेहरा आणि ओठ अतिशय मऊ आणि चकाकदार होईल.
* केळ त्वचेसाठी खूप लाभदायक आहे. पिकलेले केळ चांगल्या प्रकारे बारीक करून फेसपॅकप्रमाणे लावा. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर रक्त चंदनाचा लेप लावा. हा उपाय केल्यास त्वचा उजळेल.
* दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करून घ्या. हे मिश्रण चांगल्या प्रकारे लावा. २० मिनिटांनी चेहरा ओल्या कापसाने स्वच्छ करून घ्या. या उपायाने त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ होईल.
* कोरफडीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही ठिंब टाका. हे मिश्रण लावून वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्या.
* दोन चमचे टोमॅटोचा रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण लावा. २० मिनिटांनी चेहरा धवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ दिसेल.
* बेसन, मध, ऑलिव्ह, दुधाची साय एकत्र करून तयार केलेला फेसपॅक प्रभावी टॉनिकप्रमाणे काम करतो.
* एक चमचा हळदीमध्ये एक चमचा दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट १५ मिनिट लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. या फेसपॅकने त्वचेवरील काळेपणा दूर होईल.
* हळद, चंदनामध्ये दुधाचे काही थेंब टाकून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट लावून २-३ मिनिट हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर १० मिनिट पेस्ट तशीच ठेवा. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या. चेहरा उजळलेला दिसेल.
* एक बटाटा बारीक करून त्यामध्ये दही मिसळा. हा लेप चेहरा, मानेवर १५ मिनिट लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्वचा उन्हामुळे काळवंडली असेल तरीही हा उपाय केल्यास लाभ होईल.