आरोग्यनामा ऑनलाइन टीम – केसगळतीची वेगवेगळी कारणे असतात. परंतु, तरूणपणात केसगळती सुरू झाल्यास ते अधिक त्रासदायक ठरते. यासाठी काही घरगुती उपाय केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. या समस्येवर काही घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय करा
१) मूग केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. रोज मूग डाळ असलेला आहार घ्या.
२) खिचडी, मूग डाळीचा लाडू, मूगडाळीचा हलवा आदी स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक खाद्यपदार्थ खाऊ शकता.
३) यात विटॅमिन ए, बी, सी आणि ई, पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम असते.
४) मोड आलेले मूग खाल्ल्यास केस गळतीची समस्या नष्ट होते. केस दाट, चमकदार आणि मजबूत होतात.
५) मोड आलेल्या मूगात ३० कॅलरी आणि १ ग्रॅम फॅट, मॅग्निशियम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, विटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फॉस्फोरस, आयर्न, विटॅमिन बी-६, थायमिन आणि प्रोटीन असते.