आरोग्यनामा ऑनलाईन टीम – खाज येणे, त्वचा लाल होणे, खरूज यांसारखे त्वचारोग आपल्याला माहित आहेत. मात्र या त्वचा रोगांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण त्वचेत हे रोग मुळ ठरू लागते. आणि त्यानंतर कितीही उपाय केले तरी तो त्रास पुन्हा पुन्हा होऊ लागतो. यामध्ये सतत खाज येते. अन् खाजवल्याने काळे डाग पडतात, त्याला एक्जिमा म्हणतात.
१) तुम्हाला जर एक्झिमाचा त्रास असेल तर कडूलिंबाचा रस प्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
२) तुम्हाला जर एक्झिमाच्या समस्येने ग्रासले असेल तर दूधात गुलकंद घालून प्या.
३) कडूलिंबाची पाने वाटून त्यात दही घालून ती पेस्ट खाज येणाऱ्या जागी लावा.
४) झेंडूची पाने पाण्यात उकळवून त्याची पेस्ट लावणे देखील उपयुक्त ठरेल.
५) समुद्राच्या पाण्याने अंघोळ केल्याने एक्जिमाच्या रुग्णाला फायदा होतो.
६) कडूलिंबाची पाने पाण्यात घालून उकळवा आणि त्या पाण्याने अंघोळ करा.
७) डाळिंबाच्या पानांची पेस्ट लावा.
८) केळ्याच्या गरात लिंबाचा रस घालून ते मिश्रण खाज येणाऱ्या जागी लावा.