आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि मानसिक ताणतणावामुळे पोट बिघडण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याचा शरीरावर वाईट परिणाम होत आहे. यातूनच अॅसिडिटी आणि बध्दकोष्ठतेची समस्या होते. काही सोपे उपाय केल्यास ही समस्या झटपट दूर होऊ शकते. फक्त २ दिवसात डायजेशन सुधारण्याचा उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय करा –
* एक ग्लास पाण्यात दोन चमचे धना पावडर मिसळा.
* यामध्ये अर्धा चमचा सुंठ मिसळा.
* हे मिश्रण मंद आचेवर पाच मिनिटे उकळवा.
* हा काढा चार-चार चमचे दुपारी आणि संध्याकाळी घ्या.