१) बेकिंग पावडरमध्ये दूध मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. आणि त्याला तुमच्या कोपरावर आणि गुडघ्यावर लावा. दिवसातून दोन-तीन वेळा जर तुम्ही ही पेस्ट लावली. तर तुम्हाला काही दिवसातच तुमचे गुडघे आणि कोपर उजळलेले दिसतील.
२) डार्कनेसवर स्क्रब केलं तर ते फायद्याचे असते. साखरेला नैसर्गिक स्क्रब म्हंटल जात. साखर ही आपल्या स्किनला एक्सफोलिएट करते. आणि ऑलिव्ह ऑइल मॉइश्चराइज करते. त्यासाठी साखरेमध्ये आवश्यकतेनुसार ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. आणि त्याची पेस्ट बनवा. हि पेस्ट कोपर आणि गुडघ्याला लावा. आणि पाच ते सात मिनिटे त्याला मसाज करा. आणि काही वेळानंतर साबण लावून धुऊन काढा.
३) बेसन आणि लिंबू हे गुडघा आणि कोपर उजळवण्यासठी चांगले मदत करते. त्यासाठी तुम्ही बेसनामध्ये लिंबाचा रस टाकून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या गुडघ्याला लावा. दोन तीन आठवड्यांनंतर तुम्हाला तुमच्या कोपरमध्ये आणि गुडघ्यामध्ये फरक जाणवू लागेल.