आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांचे तोंड येते. म्हणजे तोंडामध्ये फोड येतात. यामुळे आपल्याला काही खाता येत नाही आणि पिताही येत नाही. तुमचे तोंड आले असेल तर खालील उपाय करून तुम्ही तुमचे तोंड बरे करू शकता.
१) तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा. धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने
गुळण्या केल्याने छाले बरे होतात.
२) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या. तसेच जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.
३) पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात.
४) हळद पाण्यात घोळून ठेवावी. या पाण्याला गाळून याने गुळण्या कराव्या.
५) मधाला पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात.
६) एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.
५) तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.
६) खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात. तसेच लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.
७) सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा.