आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या आजूबाजूला असे असंख्य पदार्थ असतात, ज्यांचा उपयोग करून अनेक आजार दूर ठेवता येतात. स्वयंपाक घरात असे पदार्थ नेहमी वापरले जातात. मात्र, याबाबत माहिती नसल्याने आपण त्यांचा आजारांचा सामना करण्यासाठी वापर करत नाही. विविध आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला एका सक्षम प्रणालीची गरज असते. या प्रणालीस प्रतिकारशक्ती म्हणतात. आहारात काही छोटे बदल करून ही क्षमता वाढवता येते.
स्वयंपाक घरातील औषधी पदार्थ –
हृदयविकारांचा सामना करण्याची शक्ती लसणामुळे वाढते. लसूण खाल्याने रक्तदाब निंयत्रणात राहण्यास मदत होते.
तसेच पालकात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. त्याचप्रमाणे पालक हा व्हिटॅमिन्स ए, सी आणि केचा चांगला स्रोत आहे. पालकाच्या मदतीने प्रतिकार क्षमता वाढवता येते.
हरभऱ्यामधील फायबरमुळे पाचन प्रणाली सक्षम होते. पोटातील आजाराचा सामना करण्यासाठी हरभरा अत्यंत उपयोगी आहे. यातील पोटॅशियम आणि सोडियम शरीरासाठी पोषक असते. तसेच सर्दीत होणाऱ्या आजारात आल्याचा वापर लाभदायक ठरतो. संसर्गापासून बचाव करण्यासाठी आले उपयोगी आहे.
बीटमध्ये जास्त प्रमाणात बीटा कॅरोटीन आढळते. शरीर याचे रूपांतर व्हिटॅमिन ए मध्ये करते. व्हिटॅमिन ए शरीराची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.
स्ट्रॉबेरी, जांभूळ सारख्या फळांचा आहारात समावेश केल्यास प्रतिकार क्षमता वाढते. यात व्हिटॅमिन्स सी आणि ई असते. बॅरीज दह्यासोबत खाल्यास जास्त फायदा होतो.
आळंबीत असणारे पोषक घटक पांढऱ्या रक्त पेशी वाढवतात. यामुळे शरीराला आजारांचा सामना करण्याची शक्ती मिळते. आळंबीचा आहारात समावेश केल्यास आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
सर्दी-पडशाचा सामना करण्यासाठी गाजर सर्वात गुणकारी आहे. यातील बीटा कॅरोटीन सर्दीचा सामना करते.
संधिवात असलेल्या रुग्णांना वेदना होत असतील तर त्या जागी कस्टर ऑइलने मसाज करावी. यामुळे सांधेदुखीचा त्रास आणि सूजही कमी होते.
आवळ्याचा रस किंवा चूर्ण खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. आवळ्याचे नियमित सेवन केल्यास मलावरोध दूर होतो.