डेंग्यूवर रामबाण घरगुती उपाय आहेत पपईची पाने, असे करा सेवन

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मलेरिया, चिकून गुनिया आणि डेंग्यू हे आजार पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पसरतात. मागील काही वर्षांत या आजारांनी अनेक बळी घेतले आहेत. यापैकी डेंग्यू हा डासांमुळे होणारा एक जीवघेणा आजार आहे. डोकेदुखी, मळमळ, उलटी, डोळ्यांत दुखणे आणि शरीरावर पुरळ उठणे ही डेंग्यूची प्राथमिक लक्षणे आहेत. हा आजार बळावल्यास पोटदुखी, हिरड्या आणि नाकातून रक्तस्राव होणे, लघवीद्वारे रक्त वाहणे, श्वास घेण्यास अडचण आणि थकवा असे त्रास होतात. अशी घातक लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जाऊन ताबडतोब उपचार घ्यावेत. डेंग्यूसारख्या आजारावर काही घरगुती उपाय सुद्धा असून पपईच्या पानांचा रस डेंग्यूवर रामबाण उपाय आहे.

पपईच्या पानातील गुणधर्म

* डेंग्यूच्या तापाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या प्लेटलेट्स कमी होतात. अशास्थितीत पपईच्या पानांचा रस सेवन केल्यास रक्तपेशी वाढवण्यास मदत करतात.

* पपईच्या पानांमध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडेंट असते. यामुळे इम्यून सिस्टम चांगली होते.

असा तयार करा रस
पपईची पाने बारीक करून रस काढून घ्यावा. हा रस दिवसातून २ चमचे २ वेळा सेवन करावा. यामध्ये थोडे मध किंवा फळांच्या ज्युस टाकून सेवन केला तरी चालते.