आरोग्यनामा ऑनलाइन टीम – घसा दुखणे ही सामान्य समस्या असली तरी ती त्रासदायक वाटते. यामुळे तुमच्या कामावरदेखील परिणाम होऊ शकतो. घसा खराब होण्याची वेगवेगळी कारणे असली तरी हवामानात बदल, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, इजा ही प्रमुख कारणे आहेत. या समस्येमुळे अन्न गिळताना त्रास, अंगात कणकण असा त्रास होतो. काही घरगुती उपाय केल्यास घशाची ही समस्या दूर होऊ शकते.
हे आहेत उपाय
१) गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात. हा उपाय प्रभावी आहे. या पाण्यात थोडी हळद टाकल्यास लवकर आराम पडतो.
२) मधाचे सेवन करावे. हे थेट परिणामकारक आहे.
३) सी जीवनसत्वाची मात्रा अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
४) श्वसन प्रणालीतील वरच्या नळीला संसर्ग झाल्यासदेखील हा त्रास होतो. त्रास जास्त वाटत असेल तर डॉक्टरांकडे जावे.
५) लसणाची पाकळी चावून खावी. यात एंटिबॅक्टेरिया आणि एंटिसेप्टिक गुण असल्याने आराम मिळतो, असे तज्ज्ञ सांगतात.
६) आलेयुक्त चहा, तुळशीची पाने, तुळशीचा काढा घतला तरी आराम मिळतो.
७) चिकन सूपचे सेवन सुद्धा करू शकता. यामुळे विनाऔषध आराम मिळतो.