आरोग्यानामा ऑनलाइन टीम : अयोग्य आहार, वाईट सवयी आदी कारणांमुळे अपचन, गॅस, पोटफुगी अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. परंतु, डॉक्टरांकडे न जाताही या समस्या दूर करता येतात. यासाठी घरच्याघरी काही उपाय केले तरी या समस्या दूर होऊ शकतात. हा त्रास का होतो, याची कारणे आणि उपाय याबाबत जाणून घेवूयात.
हे लक्षात ठेवा
बीन्स, ब्रोकोली, कांदा, लसूण यासारख्या भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटात गॅसेस तयार होतात. पोट फुगते. डेअरीच्या पदार्थांमुळे पोटफुगीचा त्रास होत असल्यास ते खावू नका.
रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. यामुळे बध्दकोष्ठता होत नाही. पोटफुगी होत नाही.
घाईघाईत जेवू नका. अन्न व्यवस्थित चावून खा. अन्न चुकीच्या पद्धतीने सेवन करण्याच्या सवयींमुळे पोटफुगी होते. त्यामुळे एकाजागी शांतपणे बसून, सावकाश, चावून चावून खा.
अननस खा. याच्या सेवनाने पचनाची क्रिया सुलभ होते. पोटफुगी होत नाही.
बैठे काम करत असाल तर अधुनमधुन फेरफटका मारा. रोज किमान ३० ते ४५ मीनिटांचा व्यायाम करा.
अल्कोहोलचे कमी सेवन करा अथवा बंद करा. यामुळेही पोटफुगी होते.
जेवणात मीठ अतिश कमी वापरा. जास्त मीठ शरीरात दोष निर्माण करते. शरीरात मीठाच्या रूपाने जाणारे सोडियमचे प्रमाण कमी केले, की पोटफुगी कमी होते. बाहेरचे पदार्थ खाणे बंद करा.
दिवसभरात योग्यप्रमाणात पाणी प्या. कारण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर फुगते. कलिंगड, मोसंबी, डाळिंब या फळांचे ज्यूस प्या.
Visit : arogyanama.com