आरोग्यनामा ऑनलाइन टीम –उडीद डाळीचे पापड आणि अन्य काही खाद्यपदार्थ एवढेच आपल्याला माहिती आहे. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये सुद्धा उडीद डाळ वापरली जाते. परंतु, अनेक रोगांवर या डाळीचा औषध म्हणून वापर होऊ शकतो.उडदाची डाळ ही काळी आणि पांढरी अशा दोन प्रकारात मिळते. शरीरासाठी पौष्टिक असणारी उडीदडाळ औषधीही आहे. यामध्ये व्हिटॅमिन, खनिज, लवण भरपूर प्रमाणात असते. तसेच कोलेस्टेरॉल नगण्य असते. उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह तत्व, मॅग्नेशिअम तत्व भरपूर प्रमाणात असतात.
उडीदडाळीचे फायदे –
काही आदिवासी लोक केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी उडदाच्या डाळीचा वापर करतात. हा उपाय करण्यासाठी उडदाची डाळ शिजवून वाटून घ्यावी आणि रात्री झोपण्यापूर्वी वाटून घेतलेली डाळ डोक्याला लावून झोपावे. यामुळे केस गाळण्याची समस्या दूर होते.
अपचन, मलावारोध समस्या असल्यास उडदाच्या डाळीचे सेवन करावे. या उपायने पोट साफ राहते आणि पचनक्रिया व्यवस्थित होते.
उडदाच्या डाळीचे पीठ शरीराला लावून स्नान केल्यास शरीरावरील पांढरे डाग म्हणजेच ल्युकोडर्माच्या समस्येतून आराम मिळतो.
उडदाची डाळ रात्री दुधात भिजवून ठेवून सकाळी बारीक करावी. यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध टाकून हा लेप चेहऱ्यावर लावावा. एक तासानंतर चेहरा धुवावा. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास चेहऱ्यावर चमक येते.
पुरुषांमधील कमजोरी दूर करण्यासाठी आणि यौन शक्ती कायम ठेवण्यासाठी उडीद रामबाण उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी उडदाच्या डाळीच्या पाण्याचे सेवन करावे.
सांधेदुखीच्या रूग्णांनी काळी उडदाची डाळ एका सुती कपड्यामध्ये बांधून तव्यावर गरम करून घ्यावी. त्यानंतर वेदना होत असलेल्या ठिकाणी या डाळीने शेकल्यास आराम मिळतो. आदिवासी लोक उडदाची डाळ खाद्यतेलामध्ये गरम करून घेतात आणि त्या तेलाने मालिश करतात. या उपायाने गुडघे, सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
तोंडावरील फोड, मुरूम, पुरळ, जखमांवर उडदाच्या डाळीची पट्टी बांधून ठेवल्यास आराम मिळतो.
अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीची या तेलाने मालिश केल्यास फायदा होतो. सडपातळ लोकांनी उडदाच्या डाळीचे सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते. आदिवासी लोकांच्या माहितीनुसार उडदाच्या डाळीचे नियमित सेवनाने तब्येत सुधारते तसेच वजन वाढण्यास मदत होते.