नपुंसकता मुळापासून नष्ट करण्यासाठी चिंच उपयोगी ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पदार्थाला चव आणण्याचे काम चिंच करते. त्यामुळे स्वयंपाक घरात गृहीणी आवर्जून चिंच ठेवतात. चिंचेचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. आंबटगोड चव असणाऱ्या चिंचेत अनेक औषधी गुणधर्म आहेत. चिंच विविध औषधी गुणांनी भरलेले परिपूर्ण फळ आहे. महत्वाचे म्हणजे नपुंसकता मुळापासून नष्ट करण्याची ताकद चिंचेत आहे. तसेच इतर अन्य आजारावरही चिंच रामबाण उपाय आहे. याबाबत आपण सविस्तर जाणून घेवूयात.
१) नपुंसकता दूर करण्यासाठी चिंचेच्या बिया म्हणजेच चिंचोके दुधामध्ये खूप वेळ उकळून घ्यावेत. त्यानंतर त्यावरील टरफल काढून टाकावे. या बिया बारीक करून शुद्ध तुपात भाजून घ्याव्यात. त्यानंतर त्यामध्ये समान मात्रेत खडीसाखर घालून सर्व मिश्रण एकत्र करून ठेवावे. दररोज १ ते २ चमचे या मिश्रणाचे सेवन केल्यास नपुंसकतेची समस्या दूर होते.
२) तसेच थोडा ओवा, चिंचेच्या बिया आणि समान मात्रेत गुळ घेऊन शुद्ध तुपात एकत्रित भाजून घ्यावे. त्यानंतर याचे चूर्ण तयार करून ठेवावे. दररोज एक चमचा हे चुर्ण सेवन केल्यास नपुंसकता दूरू होते.
चिंचेचे इतर औषधी उपयोग –
ताप आला असल्यास पिकलेल्या चिंचेच्या १५ ग्रॅम रसाची मात्रा ताप आलेल्या व्यक्तीस द्यावी. या रसामध्ये विलायची आणि थोड्या प्रमाणात खारीक टाकल्यास जलद फरक पडतो.
हृदयात जळजळ होत असल्यास चिंचेच्या रसामध्ये थोडी खडीसाखर टाकून प्यायल्यास जळजळ कमी होते.
चिंचेच्या झाडाची पाने आणि फुले एकत्रितपणे पाण्यात उकळून काढा तयार करावा. कावीळ झालेल्या रुग्णाला हा काढा दिल्यास काविळ बरी होते. या काढ्याचे सेवन आठवडाभर रोज दोन वेळेस केल्यास कावीळ लवकर बरी होते.
पाचशे ग्रॅम चिंच चार दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. त्यानंतर चिंच उन्हामध्ये वाळवून घेऊन बारीक करावी. त्यानंतर त्यामध्ये पाचशे ग्रॅम खडीसाखर मिसळून चूर्ण तयार करावे. दररोज एक चमचा चूर्ण दुधामध्ये टाकून घेतल्यास चांगला फायदा होतो. तसेच उलटी, मळमळ होत असल्यास चिंच पाण्यात भिजवावी. हा रस पिल्यास मळमळ, उलटी थांबते.