आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रेम, सुंदरता आणि कोमलतेचे प्रतिक असलेले गुलाबाचे फुल विविध औषधी गुणांनी सुद्धा युक्त आहे. विविध आजार बरे करण्याची क्षमता गुलाबाच्या फुलामध्ये आहे. एक-दोन नव्हे तर अनेक आजारांवर गुलाबपुष्पाचा वापर करून उपचार करणे शक्य आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार करण्यात येत असलेल्या गुलकंदला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. गुलाबाचे खास उपाय कोणते आहेत, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
* गुलकंदमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्वचेसाठी हे खूप लाभदायक आहे.
* चेहऱ्यावर डाग, मुरूमं असतील तर गुलकंदाचे सेवन करावे. चांगला फरक पडतो. अतिउष्णतेमुळे शरीरावर फोड येत असल्यास गुलकंद खावे.
* डोळ्यांची जळजळ किंवा डोळ्यात धूळ गेल्यास गुलाब पाण्याने डोळे धुवावेत. आराम मिळतो.
* गुलाबाच्या पाकळ्या बारीक करून हा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी थांबते.
* रोज सकाळी आणि संध्याकाळी एक चमचा गुलकंद खाल्ल्यास पित्ताचा त्रास कमी होईल.
* अनिद्रा, तणाव घालविण्यासाठी रात्री डोक्याजवळ गुलाब ठेवून झोपावे. अनिद्रेची समस्या दूर होते.
* गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्यास हिरड्या आणि दात मजबूत होतात. तोंडातील दुर्गंधी दूर होते आणि पायरिया रोगातून मुक्ती मिळते.
* गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असल्याने गुलकंद दररोज खाल्ल्यास हाडे मजबूत होतात. दररोज एक गुलाब खाल्ल्यास टी.बी रुग्णाला लवकर आराम मिळतो.
* ओठ गुलाबी आणि कोमल होण्यासाठी गुलाबाची पाने ग्लिसरीनमध्ये टाकून बारीक करून घ्यावीत. हे मिश्रण ओठांना लावावे.
* गुलकंदमुळे शरीराला थंडावा मिळतो. हे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते आणि शरीर ताजेतवाने ठेवते. गुलकंद शरीराला स्फूर्ती देणारे शीतल टॉनिक आहे. यामुळे थकवा, आळस, मासपेशींमधील वेदना दूर होतात.
* अर्जुन वृक्षाची साल आणि देशी गुलाब पाण्यामध्ये एकत्र उकळून घ्यावे. हा काढा दररोज पिल्यास हृदयाशी संबंधित आजार दूर होतात. हृदयाचे ठोके वाढल्यास गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या उकळून तो काढा घ्यावा.
* गुलकंदमध्ये सी, ई आणि बी व्हिटॅमिनचे भरपूर प्रमाण असते. जेवण केल्यानंतर गुलकंद खाल्ल्यास पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात.