आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लाल मिरची पावडर जेवणामध्ये सर्रास वापरली जाते. यामुळे लाल मिरची आणि मिरची पावडरला खूप मोठी मागणी आहे. अनेक पदार्थ याशिवाय तयार होऊ शकत नाही. हिरव्या मिरची एवढीच लाल मिरची जेवणात महत्वाची आहे. लार मिरचीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत, हे अनेकांना माहित नसते. परंतु, लाल मिरची जास्त प्रमाणात सेवन केल्यास तिचे दुष्परिणामही दिसून येतात. मिरचीचे नियंत्रित तिखट पदार्थ खाण्यास काहीच हरकत नसल्याचे नवीन संशोधन सांगते. मिरचीमध्ये विविध पोषक तत्वांचे भांडार आहे. यामुळे पूर्वीपासूनच मसाल्याच्या स्वरुपात लाल मिरचीचा वापर केला जातो.
लाल मिरचीतील उपयोगी तत्व
सक्सीनिक अॅसिड, शिकमिक अॅसिड, ऑक्जेलिक अॅसिड, क्युनिक अॅसिड, अमिनो अॅसिड, एस्कोर्बिक अॅसिड, फोलिक अॅसिड, सिट्रीक अॅसिड, मैलिक अॅसिड, मॅलोनिक अॅसिड, आल्फा-अॅमिरिन, कोलेस्टेरॉल, फायटोफ्लू, कॅप्सीडीना, कॅप्सासिन, कॅरोटीन्स, क्रिप्तोकॅप्सीन, बाय-फ्लेवोनाईड्स, कॅप्सेंथीन, कॅप्सोरूबीन इत्यादी तत्वांसह मिरचीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिवटॅमिन सी, केरोटीन इत्यादी उपयोगी तत्व असतात.
या आजरांवर करा उपाय
अॅसिडीटी, गॅस, अपचन झाले असेल तर एक ग्रॅम लाल तिखटामध्ये १०० ग्रॅम गुळ मिसळून गोळ्या तयार कराव्यात. या गोळीच्या सेवनाने आराम मिळतो.
पोट दुखत असेल तर लाल मिरचीच्या दोन ग्रॅम बिया कोमट पाण्यातून घ्याव्यात.
भूक लागत नसेल तर मिरचीच्या बियांचे २ थेंब तेल बत्ताशावर टाकून सेवन करावे. यामुळे भूक न लागण्याची समस्या दूर होते.
डोळे दुखत असतील तर लाल तिखटाची पेस्ट करून त्याचा लेप जो डोळा दुखत आहे त्या बाजूच्या पायाच्या अंगठ्यावर लावा. दोन्ही डोळे दुखत असतील तर पायाच्या दोन्ही अंगठ्यावर लावा.
बदाम आणि साखरेची पूड समान मात्रेमध्ये घेऊन त्यामध्ये थोडेसे लाल तिखट टाकावे. या मिश्रणाच्या छोट्या गोळ्या तयार करून एक गोळी दररोज खाल्ल्यास आवाज मधुर होतो. तसेच गळ्याशी संबंधित आजार दूर होतात.
यातील कॅप्सासिन नावाचा घटक वेदनाशामक आहे. दमा, सर्दी, ताप या आजारात हा पदार्थ पूरक ठरतो. तसेच वजन कमी करण्यासाठी सुद्धा तो लाभदायक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
यातील उपयोगी तत्वांमुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. रक्तपुरवठा सुरळीत होतो, असे संशोधक म्हणतात. तसेच हृदयरोगापासून व्यक्ती चार हात दूर राहतो.