आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पदार्थांची चव वाढविणारा जायफळ हा मसाल्याचा प्रमुख पदार्थ असून यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. दमा, शीघ्रपतन आणि नपुंसकता अशा विविध आजारांवर जायफळ रामबाण औषधी उपाय आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात. मसाल्यांमध्ये सहसा जायफळाची पूड वापरली जाते. नपुंसकतेची समस्या असल्यास जायफळ हा रामबाण उपाय आहे.
नपुंसकता
जायफळ उगाळून दुधात मिसळून आठवड्यातून तीनदा घ्यावे. हे जायफळयुक्त दुध पिल्याने नपुंसकतेची समस्या दूर होऊन यौनशक्ती वाढते. याचे चूर्ण आणि तेल शीघ्रपतन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते.
संधीवात
शरीराचे सांधे दुखणे म्हणजे संधिवात. कोपरे, खांदे, गुडघे, पायांची बोटे, मानेचे सांधे दुखणे ही संधीवाताची लक्षणे आहेत. एक चमचा जायफळ तेल आणि चार चमचे मोहरीचे तेल एकत्र करून सांध्यांची मालिश केल्यास आराम मिळतो. या तेलाच्या मालिशने शरीरात स्फूर्ती निर्माण होते.
सौंदर्य समस्या
जायफळ दुधामध्ये उगाळून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होऊन चेहरा तजेलदार होईल. डोळ्याखाली डार्क सर्कल असल्यास जायफळाचे सेवन करावे.
दातदुखी
दात दुखत असल्यास जायफळाचे तेल कापसावर लावून दुखणारा दात व हिरड्यांवर लावावे. दात दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात किडले असतील तर हा उपाय अवश्य करावा.
तोंड येणे
तोंड आले असल्यास जायफळ पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. लवकर आराम मिळतो.
अपचन, गॅस
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी जेवणात जायफळाचा उपयोग करावा. जायफळामुळे पाचक रसामध्ये वाढ होते. जायफळाच्या सेवनाने पोटाचे सर्व आजार दूर होतात. जायफळ, सुंठ आणि जिरे एकत्र बारीक कुटून याचे चूर्ण तयार करा. जेवणापूर्वी पाण्यात टाकून हे चूर्ण घेतल्यास पोटात गॅस होणार नाही.
सूज
कानाच्या मागे सूज किंवा गाठ असेल तर जायफळ पाण्यामध्ये उगाळून त्याचा लेप सुजलेल्या ठिकाणी लावावा. सूज कमी होण्यास मदत होईल.