दातांसाठी
३ सुपाऱ्या भाजून त्यांचे बारीक चूर्ण तयार करावे. या चुर्णामध्ये ५ थेंब लिंबाचा रस आणि एक ग्रॅम काळे मीठ मिसळावे. दररोज दिवसातून दोन वेळेस या मिश्रणाने दात घासल्यास दात मजबूत होतात.
डायबिटीजमुळे काहीवेळा तोंड कोरडे पडते. अशी समस्या असेल तर तोंडामध्ये सुपारीचा एक तुकडा ठेवावा.
दातदुखी
सुपारीमध्ये अँटी-बॅक्टीरिअल गुण असतात. दात खराब होवू नयेत म्हणून सूपारीचे मंजन लाभदायक आहे. दात किडले असतील तर सुपारी जाळून मंजन तयार करावे. या मंजनाने दात घासल्यास किडत नाहीत.
उच्च रक्तदाबा
सुपारी खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. सुपारीमधील टॅनिन तत्वामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
डिप्रेशन
सुपारी खाल्ल्याने तंत्रिका तंत्र उत्तेजित होते. सुपारी चघळत राहिल्यास तणाव दूर होतो, असे एका संशोधनात आढळून आले आहे.