आरोग्यनामा ऑनलाइन टीम –भेंडी ही अत्यंत प्रचलित भाजी आहे. अनेक घरांमध्ये भेंडीची भाजी आवर्जून बनविली जाते. चविष्ट असलेली भेंडी बहुतांश लोकांना आवडते. त्यामुळे बाजरात या भाजीला चांगली मागणी असते. आदिवासी भागांमध्ये अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी भेंडीचा उपयोग केला जातो.
मधुमेहाच्या रूग्णांनी भेंडीचे भरपूर प्रमाणात सेवन करावे. हिरवी ताजी भेंडी जास्त प्रभावशाली असते. कावीळ, ताप, सर्दी खोकला या आजारांमध्ये मधोमध कापलेल्या पाच भेंड्या अर्धा चमचा लिंबाचा रस, डाळिंब आणि आवळ्याच्या पाकळ्या ही सर्व सामग्री एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. दुसèया दिवशी सकाळी हे मिश्रण चांगल्याप्रकारे कुटून घ्यावे. दररोज दोन वेळेस नियमित सात दिवस या मिश्रणाचे सेवन करावे. या उपायाने कावीळ सारखा घातक आजार एक आठवड्याच्या आत नियंत्रणात येतो.
भेंडीतील बिया वाळवून घेवून त्याचे चूर्ण लहान मुलांना द्यावे. या बिया प्रोटीनयुक्त असतात आणि उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे चूर्ण टॉनिकप्रमाणे कार्य करते. नपुंसकता दूर करण्यासाठी पुरुषांना कच्ची भेंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. आदिवासी लोक शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी भेंडीला उपयुक्त औषध मानतात.
आदिवासी लोक भेंडीचा काढा तयार करून सिफि़लिस हा यौनसंचारित आजार असेलेल्या व्यक्तीला देतात. ५० ग्रॅम भेंडी बारीक कापून २०० मि.ली. पाण्यामध्ये उकळून घेतली जाते. जेव्हा हे पाणी उकळून अर्धे शिल्लक राहते तेव्हा आजारी व्यक्तीला पिण्यासाठी दिले जाते. एक महिना हा काढा नियमित घेतल्यास आराम मिळतो.