फणस खाल्ल्याने दूर होतात ‘हे’ आजार, जाणून घ्या घरगुती उपाय
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – फणसात अनेक औषधी गुणधर्म आहेत. फणसाच्या गऱ्यात ७८.२ टक्के जलांश, १.९ टक्के प्रथिने, ०.१ टक्का स्निग्ध पदार्थ आणि १८.९ टक्के कार्बोहायड्रेट, काही प्रमाणात अ, क जीवनसत्त्वे आणि खनिज द्रव्ये असतात. बियांमध्ये ५१.६ टक्के जलांश, ६.६ टक्के प्रथिन, ०.४ टक्के वसा आणि ३८.४ टक्के कार्बोहायड्रेट असतात. बियांमध्ये ब १ व ब २ ही जीवनसत्त्वे भरपूर असतात.
अल्सर
फणसाच्या पानांचे चूर्ण अल्सरच्या रुग्णांसाठी लाभदायक आहे. फणसाची कोवळी पाने स्वछ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यावीत. वाळलेल्या पानांचे चूर्ण तयार करून घेतल्यास पोटातील अल्सर बरा होतो.
अन्न पचन
पिकलेल्या फणसामधील गर बारीक करून पाण्यात उकळून घ्यावा. हे मिश्रण थंड करून एक ग्लास पिल्याने भरपूर एनर्जी मिळते. पचन व्यवस्थित होते.
डायबिटीज
फणसाच्या पानांचा रस तयार करून पिल्यास डायबिटीज नियंत्रणात राहतो. हाय ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी सुद्धा हा रस गुणकारी आहे.
पोटदुखी
फणसाचे जास्त प्रमाणत सेवन केल्यास पोट साफ राहते. पचनाची समस्या दूर होते.
वजन वाढते
पिकलेल्या फणसाचे सेवन केल्यास वजन वाढण्यास मदत होते.
Comments are closed.