सर्दीसह, पोटदुखी, सांधेदुखी आणि दम्यावर बहुगुणी अद्रक

Ginger

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  अद्रक टाकलेला गरमा-गरम वाफाळता चहा घेतला की सर्दीपासून आराम मिळतो, असा अनुभव आपण नेहमीच घेतो. खोकल्यावरही अद्रक गुणकारी आहे. सर्दी-खोकल्यावर गुणकार असलेले आद्रक अनेक आजारात लाभदायक आहे. पोटदुखी, सांधेदुखी आणि दम्यासारख्या आजारात अद्रकच्या सेवनाने आराम मिळतो. प्रत्येक स्वयंपाकघरात नेहमी वापरले जाणारे अद्रक बहुगुणी औषध आहे.

पदार्थांना चव आणण्यासह अनेक औषधी तयार करण्यासाठी अद्रकचा उपयोग होतो. अद्रक उकळून, वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. अद्रक तिखट रसाचे, पाचक, अग्निदीपक, मलसारक आहे. पोट दुखत असल्यास चमचाभर अद्रकचा रस पादेलोण, लिंबाचा रस घालून घ्यावा. सांधे दुखत असल्यास सांध्यांना आल्याच्या रसात मीठ घालून चोळून घ्यावे. तसेच दम्याचा त्रास असल्यास चमचाभर आल्याचा रस तूप साखरेसोबत घ्यावा. सुंठीपासून बनवला जाणारा सुंठपाक बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये खायला दिला जातो. बाळंतिणीस सुंठपाक अत्यंत गुणकारी औषध आहे. सुंठपाकमध्ये वंध्यत्व दूर करण्याची ताकद आहे.

ताकात अद्रकचे चूर्ण घालून प्यायल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात. जुन्या सर्दीवरही सुंठेचे पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावे. यामुळे जुनी सर्दी बरी होते. जेवणापूर्वी अद्रक खाल्ल्यास भूक वाढते. तोंडाची चवही चांगली होते. आम्लपित्त, पोटात दुखणे, गॅसेस होणे, अजीर्ण होणे, भूक कमी लागणे अशा जुन्या तक्रारी असल्यास जेवणापूर्वी गुळाबरोबर अद्रक थोडे दिवस खाल्ल्यास आराम पडतो. मानसिक ताण असल्यास रोज सकाळी अद्रक आणि मध एकत्रित प्राशन केल्यास चांगला फरक दिसून येतो.

हे माहित आहे का ? बटाट्यात आहेत अनेक औषधी गुणधर्म
दह्यात आहेत विविध गुणधर्म, आरोग्यासह सौंदर्य खुलवण्यासाठीही लाभदायक
सावधान ! आर्टिफिशियल स्वीटनरचा वापर करताय ? मग हे जरूर वाचा 
सावधान ! ‘या’ कारणांमुळे होतो ‘डायबेटिस’
‘ब्लॅकहेड्स’ची समस्या सतावतेय ? ; करा ‘हे’ घरगुती उपाय
स्मरणशक्ती वाढते, तणाव राहतो दूर ! सेवन करा हे ५ सुपर फूड
आठ आठवड्यांत घटवा वाढलेले ‘वजन’, ‘या’ आहेत विशेष टिप्स
दररोज ‘दुध’ प्या आणि ‘पोहे’ खा, आरोग्य राहिल उत्तम !
पनीर खाल्ले तर दात होतील चमकदार, वजन वाढेल