डायबिटीस, हृदयरोगासह अनेक आजरांवर मेथी गुणकारी, असा करा उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लेग्युमिनोसी कुळातील वनस्पती असलेल्या मेथीला ट्रिगोनेला फीनम-ग्रासम असे शास्त्रीय नाव आहे. मेथीची चव कडू असल्याने अनेकांना ती आवडत नाही. परंतु, यामध्ये भरपूर औषधी गुणधर्म असल्याने आयुर्वेदातही मेथीला खूप महत्व आहे. मेथीचा वापर पाने, बिया म्हणजेच मेथीदाणे या दोन्ही प्रकारात केला जातो. मेथीची पाने व मोड आलेल्या मेथीदाण्यांची भाजी केली जाते. मेथीदाणे हा मसाल्याचा पदार्थही आहे. वाळवलेली मेथीची पाने त्यांच्या सुगंधामुळे विविध पदार्थांत कसुरी मेथी म्हणून वापरली जातात.

मेथीदाणे

मेथीदाण्यात फॉस्फेट, लेसिथिन आणि न्यूक्लिओ-अलब्यूमिन असल्यामुळेते खूपच पोषक, गुणकारी आणी उपयोगी आहेत. प्रति १०० ग्रॅम मेथीदाण्यामध्ये
प्रोटीन – २६.२० ग्रॅम, वसा – ५.८० ग्रॅम, मिनरल्स – ३.० ग्रॅम, फायबर – ७.२० ग्रॅम, कार्बोहायड्रेट – ४४.१ ग्रॅम, एनर्जी – ३३३.० किलो कॅलरी, कॅल्शिअम – १६०.० मि.ग्रॅ., फॉस्फरस – ३७०.० मि.ग्र., आयर्न – ६.५० मि.ग्रॅ., अशी पोषक तत्वे आहेत.

मेथीची पाने

मेथीच्या १०० ग्रॅम पानांमध्ये ९.८ टक्के कार्बोहायड्रेट, ४.९ टक्के प्रोटीन. ८१.८ टक्के पाणी, १.६ टक्के खनिज, १.०टक्के फायबर, ०.९ टक्के वसा तसेच लोह १६.१९ मिलीग्रॅम ही तत्वे असतात.

हे उपाय करा

* मेथी हृदयाशी संबंधित आजारांच्या रुग्णांसाठी वरदान आहे. दररोज मेथीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते.

* एका संशोधनानुसार टाइप २ च्या डायबिटीस रुग्णांसाठी मेथी लाभदायक आहे. डायबिटीस रुग्णाने दररोज ८-१० मेथीदाण्याचे किंवा मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात राहते.

* पोट आणि आतड्याच्या समस्या असल्यास मेथीचा ज्युस घ्यावा. अतिसार आणि छाती, घाशत जळजळ यामध्ये मेथी ज्यूस रामबाण उपाय आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी थोडे मेथीचे दाणे खाल्ल्यास पोटाचे सर्व आजार दूर होतात.

* त्वचेवर खाज, चट्टे यावर मेथी रामबाण उपाय आहे. नियमित मेथी खाल्ल्यास ही समस्या दूर होते. खाज असलेल्या ठिकाणी थोडीशी मेथीची पेस्ट लावल्यास आराम मिळतो.

* ताप आलेल्या व्यक्तीने मेथीची भाजी खाणे लाभदायक आहे. ताप कमी करण्यात मेथी रामबाण आहे. मेथीच्या सेवनाने भरपूर घाम येतो. यामुळे ताप उतरण्यात मदत होते.

* मेथीदाणे बारीक वाटून घेऊन त्याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास काळेडाग, मुरूम दूर होऊन चेहरा उजळतो.

* मेथीमध्ये भरपूर लोह असल्याने महिलांसाठी फायदेशीर आहे. बाळंतिणीचे दूध वाढते. महिलांच्या शरीरातील हॉर्मोन्सचे संतुलन राखते. बाळंतिणीला मेथीचे लाडू जातात.

* केसांसाठी मेथी एक उत्तम कंडीशनरचे काम करते. मेथी रात्रभर भिजवून ठेवावी. दुसèया दिवशी सकाळी भिजलेल्या मेथिमध्ये दही मिसळून हे मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस स्वछ धुवावेत. यामुळे केसातील कोंडा आणि डोक्याच्या त्वचेची समस्या दूर होते.

* मेथीदाणे तुपात भाजून चूर्ण करून खाल्ल्यास हात-पायाच्या दुखण्यामध्ये आराम पडतो. मेथीदाण्याचे लाडू बनवून नियमित खाल्ल्यास सांधेदुखीत फरक पडतो.