आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही छोटे-छोटे आजारही अनेकदा हैराण करतात. अचानक उद्भवलेल्या या समस्येवर कोणता उपाय करावा, हे सूचत नाही. खरं तर अशा आजारांवरील औषधे आपल्या घरातच मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. केवळ त्यांचा उपयोग कसा करावा, हे माहित नसल्याने त्रास सहन करावा लागतो. असेच एक औषध म्हणजे जिरे होय. जीऱ्याचा उपयोग करून अनेक छोटे-छोटे आजार सहज दूर करता येतात. जीऱ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असल्याने, विविध आजारात त्याचा लवकर गुण येतो. जिरे कोण-कोणत्या आजारांत उपयोगी आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत प्रभावी उपाय
* जीऱ्यात अँटीसेप्टिक तत्व असते. जीऱ्याची वाफ घेतल्यास छातीत जमा झालेला कफ बाहेर येतो.
* हिंग टाकून उकळलेल्या पाण्यामध्ये जिरे, पुदिना, लिंबू आणि मीठ टाकून हे पाणी मानसिक आजार म्हणजेच हिस्टीरिया असलेल्या व्यक्तीला दिल्यास चांगला फरक दिसून येतो.
* थायरॉइडच्या रूग्णांनी एक कप पालकाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि जिरे पूड मिसळून सेवन करावी.
* शुगर, सांधेदुखी आणि पोटाच्या आजारामध्ये आराम मिळण्यासाठी मेथी, ओवा, जिरे आणि बडीशेप ५०-५० ग्रॅम आणि चवीनुसार काळे मीठ टाकून चूर्ण तयार करून घ्यावे. एक चमचा दररोज याचे सेवन करावे.
* प्रसुतीनंतर अंगावर दूध चांगले येण्यासाठी जीऱ्याचे चूर्ण आणि गूळ एकत्र करून खावे.
* तोंड आले असल्यास जिरे चघळावे.
* अंगाला खाज येत असेल, अॅलर्जीमुळे अंगावर लाल पुरळ आली असेल तर जिरे रात्री गरम पाण्यातून घ्यावे.
* जिरे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. गर्भवती महिलांसाठी जिरे खूप लाभदायक आहे.
* पचनशक्ती वाढविण्यासाठी आणि पोटाचे आजार दूर करण्यासाठी जिरे, ओवा, सुंठ, काळे मिरे आणि काळे मीठ एकत्र करून यामध्ये तुपात भाजलेले थोडेसे हिंग मिसळावे. या मिश्रणाचे नियमित सेवन करावे.
* भूक लागण्यासाठी जिरे, ओवा, काळे मीठ एकत्र करून चूर्ण तयार करावे. दररोज एक चमचा या चुर्णाचे सेवन करावे.
* ३ ग्रॅम जिरे आणि १२५ मिलीग्रॅम तुरटी एका कपड्यात बांधून गुलाबपाण्यामध्ये भिजवून ठेवा. डोळे दुखत असल्यास किंवा लाल झाल्यानंतर या मिश्रणाचे थेंब डोळ्यात टाकल्यास आराम मिळतो.
* अतिसार म्हणजेच डायरियाचा त्रास होत असल्यास भाजलेले जिरे दह्यामध्ये मिसळून खावे.
* गुळामध्ये जिरे मिसळून गोळ्या तयार करून खावे. मलेरियामध्ये लाभ होतो.
* अॅसिडिटी घालवण्यासाठी एक चिमुटभर कच्चे जिरे खावे.
* डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी एक चमचा जिरे चूर्ण दिवसातून दोन वेळेस पाण्यासोबत घ्यावे.
* पिकेलेले केळ कुसकरुन त्यामध्ये थोडेसे जिरे मिसळून रात्री जेवण झाल्यानंतर खाल्ल्यास अनिद्रा दूर होते.