असंख्य आजारांवर जादूप्रमाणे गुणकारी ठरते ‘ही’ वनस्पती

Aloes

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आयुर्वेदात हजारो वनस्पतींचा औषधी म्हणून उल्लेख केलेला आहे. यापैकी अनेक वनस्पती सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. मात्र, काही वनस्पती अगदी सहज उपलब्ध होऊ शकतात. त्यापैकीच एक म्हणजे कोरफड होय. कोरफडी ही एक बहुगुणी वनस्पती आहे. असंख्य आजारांवर कोरफडीचा औषध म्हणून वापर केला जातो. आयुर्वेदात तिचे महत्व सांगितलेले आहे. विविध आजारांसह सौंदर्य वाढीसाठीही कोरफड रस गुणकारी आहे.

टक्कल पडले असेल तर कोरफड ही समस्या दूर करते. तसेच अल्सरचा त्रास कोरफडीच्या सेवनाने कमी होतो. कोरफडीच्या पानांच्या रसात थोड्या प्रमाणात नारळाचे तेल घेऊन कोपरे, गुडघे व टाचांवर लावल्याने त्या जागेवरचा काळेपणा दूर होतो. तसेच सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कोरफडीच्या गराचे सेवन केल्याने बद्धकोष्ट दूर होते. गुलाबपाण्यात कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचेची चमक वाढते. जळालेल्या किंवा चटका बसलेल्या भागावर तत्काळ कोरफडीचा ताजा गर लावल्यास फोड येत नाहीत. दम्याच्या आजारावर कोरफड रामबाण औषध आहे. कोरफड एक उत्तम हेअर कंडीशनर सुद्धा आहे.

सांधेदुखी आणि अंगदुखीत कोरफड रसाचे सेवन केल्यास आराम मिळतो. यामुळे शरीरात अँटीबॉडीज घटक आणि पांढऱ्या रक्तपेशी निर्माण होतात. सूज कमी होते. मुक्का मार लागला असल्यास कोरफड उपयुक्त ठरते. मूत्रपिंडाशी संबंधित संसर्गात कोरफड जेल गुणकारी ठरते. यासाठी कोरफडीच्या ताज्या जेलमध्ये पाणी आणि साखर मिसळून रस तयार करावा. हा रस पिल्यास संसर्गाची समस्या दूर होते. तसेच लघवीची जळजळ देखील कमी होते. तोंडात फोड आल्यावर कोरफडीचा गर लावल्यास फायदा होतो.

कोरफडीमध्ये भरपूर जीवनसत्त्वे तसेच अ‍ॅमीनो अ‍ॅसिडही असते. यामुळे तोंडातील फोडांमुळे दुखापतग्रस्त झालेल्या टिश्युजचे नूतनीकरण होते. तोंड आल्यानंतर तोंडातील फोडांमुळे येणारी सूज होते. या फोडांवर कोरफडीचा गर लावल्याने ५० टक्के आराम पडतो. एखादा अवयव लचकल्यास कोरफडीच्या ताज्या गरात थोडी हळद आणि सैंधव मीठ टाकून हलके गरम करावे. हे मिश्रण लचकलेल्या भागावर बांधल्यास दुखणे कमी होते. मायग्रेनने डोकेदुखी होत.

असल्यास कपाळावर कोरफड जेल लावल्यास ताबडतोब आराम मिळतो. पोटदुखी होत असल्यास कोरफडीच्या गरावर थोडेसे मीठ टाकून खावे. कोरफडीच्या रसात मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग, फोड दूर होतात. डोळे येणे, डोळ्यांची आग होणे यावर कोरफडीचा गर डोळ्यांवर ठेवावा. केसांच्या वाढीसाठी, केस मुलायम आणि तजेलदार व्हावेत म्हणून कोरफडीचा गर केसांना लावतात.

कोरफड रक्तशुद्धीकर असून ताप कमी करणारी, पित्तनाशक, भूक वाढवणारी आहे. एक ग्लास नारळाच्या पाण्यामध्ये दोन-चार चमचे कोरफडीचा रस किंवा गर टाकून पिल्यास शरीराला थंडावा मिळतो. कोरफड व्हिटामीन बी १२चा चांगला स्रोत आहे. रोग प्रतिकार शक्ती वाढवणे, मधुमेहाने त्रस्त रोगींना, संसर्गविरोधी, वेदना कमी करणारे आणि कीटाणूनाशक असे गुण असल्याने कोरफड उपयुक्त वनस्पती आहे.

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा
पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण
‘या’ पाच ‘फळा’चे सेवन केल्यानंतर ‘निद्रानाश’ होईल दूर
‘हे’ आहेत सॅलडचे ९ प्रकार, ‘कमजोरी’ दूर होऊन तब्येत होईल ठणठणीत
पालकाच्या भाजीचा रसही आहे ‘आरोग्यवर्धक’
डोळ्यातून सतत येणाऱ्या पाण्यासाठी करा ‘हे’ उपाय
‘दुधा’चा असा उपयोग केल्यास होतील ‘फायदे’च फायदे
८ आठवड्यांत घटवा वाढलेले ‘वजन’, ‘या’ आहेत विशेष टिप्स