आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Home Remedies | काही चुकिच्या सवयी आणि अयोग्य आहारामुळे दृष्टी कमजोर होण्याची समस्या सध्या सर्वच वयोगटात दिसून येत आहे. यामुळे अनेकांना चष्मा वापरावा लागतो. यामध्ये लहान मुलांची संख्याही जास्त आहे. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी काही खास आणि सोपे उपाय असून ते केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. (Home Remedies)
हे आहेत उपाय
– त्राटक केल्याने दृष्टी सुधारते. यामध्ये दिव्याचा ज्योतीकडे एकटक बघितले जाते. यामुळे एकाग्रताही वाढते.
– विटामिन इ युक्त तेल किंवा क्रीमने दररोज डोळ्यांची मसाज करा. यासाठी कोरफडही वापरू शकता.
– अंघोळ करताना डोळे कोमट पाण्याने स्वच्छ करावेत. डोळ्यात गुलाब पाणी घाला.
– झोपण्याआधी डोळ्यातून लेन्स काढा. २ तासाआधी पासून कॉम्प्युटरवर काम करणे थांबवा.
– सकाळी बागेत हिरव्या गवतावर अनवाणी पायाने चालावे.
– गाजर खा किंवा गाजराचा रस प्या.
– नियमित डोळ्यांचा व्यायाम करा. डोळ्यांची पुतळी उजवीकडून डावीकडे आणि वरून खाली फिरवा.
– दर तीन ते चार तासाने डोळे काही मिनिटांसाठी बंद करा. डोळ्यांना आराम मिळेल.
– अंगठा भुवयांच्या मधोमध ठवून काही काळ डोळ्यांना त्या बिंदूवर केद्रिंत करा.
Weight Loss Tips | डाएटमध्ये ‘या’ 5 आयुर्वेदिक गोष्टींचा करा समावेश, वेगाने कमी होईल पोटाची चरबी
Super Healthy Seeds | अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवतात ‘या’ 6 बिया, जाणून घ्या त्यांचे फायदे