‘या’ उपायांनी तारुण्य राहील दीर्घकाळापर्यंत, जाणून घ्या उपाय
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या अनियमित दिनचर्या, झोपेची कमतरता, प्रदूषण या गोष्टींमुळे अनेक लोक वेळेआधीच वृद्ध दिसू लागतात. त्वचेवर अवेळी सुरकुत्या पडणे हेसुद्धा वृद्धपणाचे एक लक्षण आहे. यामुळे आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. आहारात पोषक तत्वांची कमतरता, तळेलेले आणि तिखट पदार्थ, जास्त चहा-कॉफी तसेच अल्कोहोलचे सेवन केल्याने या समस्या निर्माण होऊ शकतात.
हे उपाय करा
* सफरचंद बारीक करून त्यामध्ये थोडेसे कच्चे दुध टाकून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट लावून थोड्या वेळाने कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून चार वेळेस हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.
* दोन टोमॅटो बारीक करून त्यामध्ये तीन चमचे दही आणि दोन चमचे गव्हाचे पीठ टाका. हे मिश्रण कमीतकमी २० मिनिटे लावून ठेवा. या उपायाने सुरकुत्या कमी होण्यास मदत होतील. आठवड्यातून दोन वेळेस हा उपाय करा.
* वडाच्या पारंब्यामध्ये अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण सर्वात जास्त आढळून येते. यामुळे या पारंब्या सुरकुत्या दूर करण्यास उपयुक्त ठरतात. कोवळ्या पारंब्या तोडून पाण्यामध्ये भिजवून बारीक करून घ्या. थोडावेळाने या मिश्रणाचा लेप लावा. या उपायाने चेहरा पूर्ववत होतो.
* रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याच्या दोन चमचे रसामध्ये दोन चमचे मध मिसळून हे मिश्रण २० मिनिट लावून ठेवा. त्यानंतर थोडासा कापूस किंवा सुती कपडा दुधात बुडवून त्याने चेहरा स्वच्छ करा.
* १/२ कप पत्ताकोबीच्या रस तयार करून त्यामध्ये १/२ चमचा दही आणि १ चमचा मध मिसळून हे मिश्रण लावा. नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ होऊन सुरकुत्या नष्ट होतील.
* तांदूळ पिठामध्ये थोडेसे दुध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टने हलक्या हाताने मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून कमीत कमी तीन वेळेस हा उपाय करावा.
Comments are closed.