आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दातांची योग्य काळजी न घेतल्यास प्लाक जमा होऊन दात पिवळे दिसू लागतात. तसेच काही पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, वाढते वय किंवा औषधींचे जास्त सेवन, या कारणांमुळेही दात पिवळे होतात. पिवळे दात पांढरे करण्याचे काही खास घरगुती रामबाण उपाय असून त्यांची माहिती आपण घेणार आहोत.
हे उपाय करा
* दररोज गाजर खाल्ल्याने दातांचा पिवळेपणा कमी होतो. जेवण केल्यानंतर गाजर खाल्ल्यास दातांची चांगल्याप्रकारे स्वच्छता होते.
* स्ट्रॉबेरीतील मॅलिक अॅसिड दातांना पांढरे आणि मजबूत करते. स्ट्रॉबेरीचे काही तुकडे घेऊन त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा मिसळावा. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण दातांना लावावे.
* केळ बारीक करून पेस्ट करावी. दररोज या पेस्टने १ मिनिट दातांची मसाज केल्यानंतर ब्रश केल्यास दातांचा पिवळेपणा दूर होतो.
* टोमॅटोचा रस दातांसाठी खूप चांगला असून या रसाने दातांवर मसाज केल्यानंतर थोड्या वेळाने ब्रश करा. या उपायने दात पांढरेशुभ्र होतात.
* तुळशीचे पाने वळवून या पानांची पावडर करावी. ही पावडर टूथपेस्टमध्ये मिसळून ब्रश केल्यास दात पांढरे होतात.
* मिठाने दात घासण्याचा उपाय प्राचीन काळापासून सुरु आहे. मिठामध्ये थोडासा कोळसा मिसळून दात घासल्यास दातांवरील पिवळेपणा दूर होतो.