हे उपाय करा
* मुलेठी, नागकेशर, बाभळीच्या शेंगा समान प्रमाणात आणि खडीसाखर घेवून हे मिश्रण बारीक करा. याचे ५ ग्राम सेवन नियमित करा. एक महिना हा उपाय केल्याने अशक्तपणा दूर होईल.
* पुनर्नवाच्या मुळांचा रस दोन ते तीन महिने दूधासोबत नियमित दोन चमचे सेवन केल्याने वृद्धांनाही तारूण्याची जाणीव होते.
* १०० ग्राम कौंच चे बीज आणि १०० ग्राम तालमखाना बारीक करुन चुर्ण तयार करा. नंतर यामध्ये २०० ग्राम खडीसाखर बारीक करुन मिसळा. हे चुर्ण कोमट पाण्यात मिसळून सेवन करा.
* रोज आवळ्याचा मुरब्बा, केळी खाल्ल्याने शक्ती वाढते. केळी खाल्ल्यानंतर दूध प्या.
* असगंधचे चुर्ण आणि बिदारीकंद १००-१०० ग्राम घेऊन त्याचे बारीक चुर्ण बनवा. दुधामध्ये हे अर्धा चमचा चुर्ण टाकून सकाळ संध्याकाळ सेवन करा. अशक्तपणा दूर होतो.
* डाळिंबाची साल वाळवून बारीक करा. रोज सकाळ संध्याकाळ हे चूर्ण खा. अशक्तपणाची समस्या दूर होईल.
* रोज रात्री झोपण्या अगोदर लसुनच्या दोन पाकळ्या सेवन करा. आवळ्याच्या चुर्णात खडीसाखर बारीक करुन मिसळा. रात्री झोपताना हे एक चमचा चुर्ण सेवन करा.
* चार-पाच खारीक, दोन-तीन काजू आणि दोन बदाम ३०० ग्राम दूधात उकळून घ्या आणि यामध्ये दोन चमचे खडीसाखर टाकून रोज रात्री झोपताना सेवन करा.