आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डोळे हे आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव आहेत. त्यामुळे डोळ्यांची आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. पण सारखं हवेत फिरणं, झोप न होणं यामुळे अनेकांच्या डोळ्यातून सारखं पाणी येत. यावर आपण डॉक्टरांकडून उपचार घेणं गरजेचं आहे. पण ते जर आपल्याला शक्य नसेल तर आपण काही घरगुती उपाय करू शकतो.
१) डोळ्यातून पाणी येत असेल तर थंड पाण्याने डोळे धुऊन घ्या. आणि मऊ व स्वच्छ कापडाने डोळे पुसून घ्या. मात्र डोळे साफ करताना ते जोरात चोळू नका, जर डोळ्यात खाज होत असेल तर साफ रुमालाने डोळ्यांची हलकी मालिश करा. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
२) डोळे साफ करण्यासाठी शुद्ध गुलाब जल चा वापर करू शकता. म्हणजे डोळ्यात शुद्ध गुलाब जलाचे २ ते ३ थेंब टाकून काही वेळासाठी डोळे बंद करा. असे केल्याने तुम्हाला आराम मिळेल.
३) डोळ्यात सूज आली असेल किंवा डोळे फुगले असतील तर रात्री दुधाची मलई डोळ्यांवर ठेऊन झोपा. सकाळी डोळे एकदम ताजे तवाने वाटतील. शुद्ध मध आपल्या डोळ्यांसाठी खूप चांगली असते. जर आपण रोज डोळ्यांना मध लावत असाल तर आपल्या डोळ्यात सूज व डोळे झोंबणार नाही.
४) मोबाईल, टीव्ही व कॉम्पुटर च्या सतत वापराने आपल्या डोळ्यात पाणी येण्याची समस्या होते. व डोळे दुखतात म्हणून मोबाईल, टिव्ही, कॉम्पुटरचा जास्त वापर करू नका.