आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मस हे शरीराच्या कोणत्याही भागावर येते. चेहरा, मान याठिकाणी आल्यास सौंदर्यात बाधा येते. पेपीलोमा व्हायरसमुळे मस होते. त्वचेवर पेपीलोमा वायरस आल्यावर लहान तीळ मोठा होतो. याला आपण मस म्हणतो. मसची समस्या असेल तर काही पारंपारिक उपाय करता येतात. हे उपाय कोणते आहेत, हे जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
* मस लवकर दूर करण्यासाठी एलोवेरा जेलचा उपायोग करु शकता.
* कच्चा लसुन मसवर लावून त्यावर पट्टी बांधा, एक आठवडा तसेच राहू द्या. एका आठवड्यानंतर मस निघून जाईल.
* मसवर नियमित कांदा चोळल्याने सुध्दा मस हळु-हळू दूर होते.
* एरंडीचे तेल नियमित मसवर लावा. यामुळे मस नरम पडतील आणि हळु-हळू दूर होतील.
* एरंडीच्या तेलाऐवजी कापूरच्या तेलाचा वापरसुध्दा करु शकता.
* एका कांद्याचा रस काढा. हा रस नियमित मसवर लावा. मसची समस्या दूर होईल.
* ताज्या मोसंबीचा रस मसवर दिवसातून ३-४ वेळा केल्याने मस दूर होईल.
* केळ्याची साल आतील बाजूने मसवर ठेवा आणि पट्टी बांधून घ्या. दिवसातून दोन वेळा हा उपाय करा. जोपर्यंत मस निघत नाही तोपर्यंत असेच करत राहा.
* बेकिंग सोडा आणि एरंडीचे तेल समान प्रमाणात मिसळून वापरल्याने मसची समस्या दूर होईल.
* वडाच्या पानांचा रस मस दूर करण्यासाठी खुप फायदेशीर असतो. याचा रस स्किनवर लावल्याने त्वचा सौम्य होते आणि मस आपोआप निघून जातात.
* बटाटे सोलून त्याचा तुकडा मसवर घासल्याने मस दूर होतात.
* कोंथिबीर बारीक करुन बेस्ट बनवा आणि नियमित मसवर लावा. मस काही दिवसांनंतर निघून जाईल.
* ताजी अंजीर बारीक करुन मसवर लावा. ३० मिनिट तसेच लावून ठेवा. यानंतर कोमट पाण्याने धुवन घ्या. मस निघून जाईल.
* आंबट सफरचंदाचा ज्यूस काढा. हा ज्यूस दिवसातून कमीत-कमी तीन वेळा मसवर लावा. मस हळु-हळू निघून जाईल.
* चेहरा चांगल्या प्रकारे धुवून घ्या आणि कॉटन व्हिनेगरमध्ये भिजवून तिळ-मसवर लावा. १० मिनिटांनंतर गरम पाण्याने चेहरा धुवून घ्या. काही दिवसातच मस गायब होतील.