लूज स्किनला ‘असे’ करा टाईट 

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जास्त तापमान आणि पर्यावरणातील विविध बदल यांचा परिणाम आपल्या त्वचेवरही होत असतो. जसे की  त्वचा काळी पडणे, सुरकुत्या होणे , त्वचा कोरडी पडणे. यांसारख्या अनेक समस्या उदभवतात. कोलेजन आणि इलास्टीन हे दोन प्रोटीन त्वचेचे पोषण करतात पण यांची मात्रा कमी झाल्यास स्किन लूज पडते आणि या समस्येपासून वाचायचे असेल तर हे घरगुती उपाय करून पहा.

१) अंडी आणि मध-

मधामध्ये नैसर्गिकरित्या  मॉइश्चराइजींगचे गुणधर्म असल्याने तसेच अंड्याच्या पांढऱ्या बलकामध्ये एल्ब्युमिनचे प्रमाण जास्त असते. हे त्वचेस लावल्याने पेशींची पुनर्निर्मिती होते तसेच चेहऱ्यावर चमक येते.

२) केळ –

केळ्यामध्ये जस्त, लोह, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन A, B, C, D असल्याने केलं अँटी एजिंगचे कार्य करते त्यामुळे सुरकुत्या दूर होऊन त्वचा टाईट होते.

३) लिंबू-

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते.  यामुळे त्वचेतील कोलेजन वाढते.

४) ऑलिव्ह ऑईल –

ऑलिव्ह ऑईलमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडेंट्सचे गुण असल्याने फ्री रेडिकल्सची समस्या दूर करते व चेहरा तजेलदार ठेवण्यासही मदत करते.