सतत तोंड येण्याची समस्या आहे का ? ‘हे’ 6 घरगुती उपाय केल्यास मिळेल आराम ; जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तोंड येणे हा आजार खूप त्रासदायक असतो. यामुळे खाताना त्रास होतो. पाणी सुद्धा पिणे अवघड होऊन जाते. तोंड हे गालांच्यामध्ये आणि जीभेवर येते. असंतुलित आहार, पोटाची गडबड, गुटका, मसाले ही तोंड येण्याची प्रमुख कारणे आहेत. ही एक सामान्य समस्या असली तरी कधी-कधी दिर्घकाळ राहिल्याने बोलताना, जेवताना याचा त्रास होतो. या समस्येवर काही घरगुती उपाय असून ते केल्यास ताबडतोब आराम मिळतो.
तोंड येण्याची मुख्य कारणे
* जास्त मलासेदार पदार्थ खाणे.
* जास्त गरम पदार्थ किंवा मद्य सेवन करणे.
* दातांची स्वच्छता न करणे.
* जास्त अॅसिडिक पदार्थांचं सेवन करणे.
* शरिरात व्हिटॅमिन बी आणि आयर्नचे संतुलन नसणे.
* अॅलर्जी असलेल्या पदार्थांचं सेवन करणे.
हे उपाय करा
१ खायच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप घालून ते फोडांवर लावा, लवकर आराम मिळेल.
२ लिंबूच्या रसात मध मिसळून गुळण्या केल्यास आराम मिळतो.
३ जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या, यामुळे पोट साफ होईल आणि तोंडाला आराम मिळेल.
४ एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा मिठ टाकून हे पाणी तोंडात थोडा वेळ ठेवा. हे दिवसातून दोन तीन वेळा करा. याने थोडी जळजळ आणि त्रास होईल, पण तोंडाचे फोड लवकर बरे होतील.
५ तोंडात फोड आल्यावर तुळशीचे दोन-तीन पाने चावून त्याचा रस प्या.
६ खायच्या पानचे चूर्ण तयार करा. त्यात थोडेसे मध मिसळून चाटण तयार करा. याने फोड लवकर बरे होतील.
Comments are closed.